भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता व्यावसायिक क्षेत्रात उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालाय. सौरव गांगुली पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर येथील शालबनी येथे स्टीलची फॅक्टरी सुरू करणार असल्याची माहिती समोर आलीये. येत्या पाच-सहा महिन्यांत कारखान्याचे काम पूर्ण होईल, असे गांगुलीनं सांगितलं. दरम्यान, गांगुलीनं या प्लांटशी संबंधित आपल्या योजनांची माहितीदेखील दिली.
"मी मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्ये तिसरा प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहोत. मी केवळ क्रिकेट खेळलो असं अनेक जण मानतात. परंतु २००७ मध्ये एका छोट्या स्टील प्लांटची आम्ही सुरूवात केली होती. येत्या पाच सहा महिन्यांमध्ये आमचा आणखी एक नव्या स्टील प्लांटचं काम सुरू होईल," असं गागुलीनं सांगितलं.
माद्रिदमध्ये बेंगाल ग्लोबल बिझनेस समिटला गांगुलीनं संबोधित केलं. आपण अत्याधुनिक प्लांटचे बांधकाम पुढील एका वर्षात पूर्ण करू. व्यावहारिक अनुभवावरून मी असे म्हणू शकतो की या संपूर्ण प्रक्रियेला केवळ चार ते पाच महिने लागतील असंही त्यानं यावेळी नमूद केलं. दरम्यान, सुमारे ५०-५५ वर्षांपूर्वी त्यांच्या आजोबांनी सुरू केलेल्या कौटुंबिक व्यवसायाचा उल्लेख करताना त्यावेळची राज्य सरकारे किती पाठिंबा देत होती, याचाही उल्लेख त्यानं यावेळी केला.