भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारताची अर्थव्यवस्था एक व्यक्ती स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालवू शकत नाही. भारतीय अर्थव्यवस्था आता खूप मोठी झाली आहे. एका व्यक्तीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अर्थव्यवस्थेचं उदाहरण आपण पाहतोच आहोत, अशी टीकाही रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर केली आहे. रघुराम राजन यांनी यापूर्वीही मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरून टीका केली आहे. वित्तीय तूट वाढल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागतो. ब्राऊन विश्वविद्यालयातील एका व्याख्यानादरम्यान राजन म्हणाले, अर्थव्यवस्थेसाठी मोदी सरकारकडून काही ठोस पावलं न उचलल्यामुळे ती सुस्तावलेली आहे.
2016मध्ये 9 टक्के होता विकासदर
2016च्या तिमाहीत विकासदर हा नऊ टक्क्यांच्या जवळपास होता. तो आता घसरून 5.3 टक्क्यांवर आला आहे. देशातल्या वित्तीय विभाग आणि वीज क्षेत्राला मदतीची नितांत आवश्यकता आहे. तरीसुद्धा या गोष्टींकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. विकासदर वाढवण्यासाठी या क्षेत्रांमध्ये लक्ष देण्यात आलेलं नाही.
मंदीला जीएसटी, नोटाबंदी काही प्रमाणात जबाबदार
राजन म्हणाले, या सुस्तावलेल्या आर्थिक परिस्थितीला नोटाबंदी आणि जीएसटी जबाबदार आहे. जर हे दोन्ही निर्णय जनता आणि अर्थव्यवस्थेवर लादले नसते तर अर्थव्यवस्थेनं चांगलं प्रदर्शन केलं असतं. सरकारनं कोणाचाही सल्ला न घेता नोटाबंदीचा निर्णय लागू केला आहे. नोटाबंदीनं जनतेचं नुकसानच झालं असून, त्यानं काहीही निष्पन्न झालेलं नाही.
अर्थव्यवस्थेसाठी एकाच व्यक्तीनं निर्णय घेणं घातक- रघुराम राजन
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 04:29 PM2019-10-12T16:29:21+5:302019-10-12T16:29:44+5:30