Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Loan प्रमाणे सिल्व्हर लोन पॉलिसी तयार करा, बँकांची RBI कडे मागणी; कारण काय?

Gold Loan प्रमाणे सिल्व्हर लोन पॉलिसी तयार करा, बँकांची RBI कडे मागणी; कारण काय?

गोल्ड लोनप्रमाणे सिल्व्हर लोनसाठीही पॉलिसी बनवण्याची मागणी देशभरातील बँकांनी आरबीआयकडे केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 03:00 PM2023-06-16T15:00:39+5:302023-06-16T15:01:11+5:30

गोल्ड लोनप्रमाणे सिल्व्हर लोनसाठीही पॉलिसी बनवण्याची मागणी देशभरातील बँकांनी आरबीआयकडे केली आहे.

Formulate Silver Loan Policy like Gold Loan banks request to RBI What is the reason | Gold Loan प्रमाणे सिल्व्हर लोन पॉलिसी तयार करा, बँकांची RBI कडे मागणी; कारण काय?

Gold Loan प्रमाणे सिल्व्हर लोन पॉलिसी तयार करा, बँकांची RBI कडे मागणी; कारण काय?

गोल्ड लोनप्रमाणे सिल्व्हर लोनसाठीही पॉलिसी बनवण्याची मागणी देशभरातील बँकांनी आरबीआयकडे केली आहे. सध्याच्या गोल्ड मेटल लोनच्या (GML) धर्तीवर सिल्व्हर मेटल लोनसाठी (SML) नवीन धोरण बनवायला हवं, असं बँकांचं म्हणणं आहे. दरम्यान, ग्राहकांना चांदीच्या दागिन्यांवरही कर्ज देता येऊ शकेल, यामुळे ही मागणी करण्यात आलीये.

याशिवाय, गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत हा मुद्दा रिझर्व्ह बँकेसमोर (RBI) मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. चांदीची निर्यात सुमारे 25,000 कोटी रुपयांवर पोहोचली असून या क्षेत्राकडून कर्जासाठी मोठी मागणी आहे.

विद्यमान नियमांनुसार, बँकां सोनं आयात करण्यास अधिकृत आहे आणि गोल्ड मॉनेटायझेशन स्कीममध्ये 2015 (GSM) सहभागी झालेल्या बँका दागिने निर्यातदारांना किंवा सोन्याच्या दागिन्यांच्या घरगुती उत्पादकांना गोल्ड मेटल लोन (GML) देऊ शकतात. कर्जाची परतफेड रुपयात करायची असते. बँका कर्जदाराला दिलेल्या सोन्याच्या मूल्याप्रमामे काही अटी शर्थींसह कर्ज देणाऱ्यांना एक किंवा त्यापेक्षा अधिक फिजिकल गोल्डमध्ये जीएमएलचा एक हिस्सा फेडण्याचा पर्याय देऊ शकतात.

उत्पादकांकडून मागणी
चांदीच्या वाढत्या निर्यातीदरम्यान, दागिने उत्पादक बँकांना चांदी, चांदीची उत्पादनं आणि दागिन्यांच्या उत्पादनासाठी कर्ज वाढवण्यास सांगत आहेत. या सेगमेंटमध्ये वार्षिक वाढ सुमारे 14-15 टक्के आहे. आमच्याकडे गोल्ड लोनसारखी रचना असल्यास ते अधिक चांगले होईल. रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्वं जोडल्यानं विद्यमान नियमांचं कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री होईल, असं एका बँक अधिकाऱ्यानं सांगितलं.

Web Title: Formulate Silver Loan Policy like Gold Loan banks request to RBI What is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.