लुधियाना : प्रसिद्ध उद्योगपती, हीरो सायकलचे माजी अध्यक्ष आणि हीरो समूहाचे संस्थापक ओ. पी. मुंजाल यांचे गुरुवारी डीएमसी हीरो हार्ट सेंटर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पुत्र पंकज आणि चार कन्या आहेत. आज शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
मुंजाल हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गेल्याच महिन्यात ते हीरो समूहातून सेवानिवृत्त झाले होते आणि त्यांच्या जागी त्यांचे पुत्र पंकज मुंजाल यांची हीरो मोटर्स समूहाचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मुंजाल यांनी आपल्या तीन भावांसमवेत १९४४ मध्ये अमृतसर येथे सायकलच्या सुट्या भागांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर आपल्या कंपनीला हीरो असे नाव देऊन १९५६ मध्ये भारतातील पहिला सायकल निर्मिती कारखाना स्थापन केला
होता. ८० च्या दशकात हीरो सायकल ही जगातील सर्वांत मोठी सायकल उत्पादक कंपनी बनली होती. मुंजाल यांनी तब्बल ६० वर्षेपर्यंत हीरो सायकलचे नेतृत्व केले. (वृत्तसंस्था)
हीरो समूहाचे संस्थापक ओ.पी. मुंजाल यांचे निधन
प्रसिद्ध उद्योगपती, हीरो सायकलचे माजी अध्यक्ष आणि हीरो समूहाचे संस्थापक ओ. पी. मुंजाल यांचे गुरुवारी डीएमसी हीरो हार्ट सेंटर येथे अल्पशा आजाराने निधन झाले
By admin | Published: August 13, 2015 10:04 PM2015-08-13T22:04:54+5:302015-08-13T22:04:54+5:30