Lokmat Money > बिझनेस न्यूज > एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड

एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड

नांबियार यांच्या निधनावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुराप्पा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. गेल्या काही काळापासून नांबियार आजारी होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 04:28 PM2024-10-31T16:28:10+5:302024-10-31T16:31:12+5:30

नांबियार यांच्या निधनावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुराप्पा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. गेल्या काही काळापासून नांबियार आजारी होते.

Founder of BPL, which once brought color TV to homes, tp gopalan nambiar passes away; TP Gopalan Nambiar behind the curtain of black | एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड

एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड

आजच्या ३०-३५ शीच्या पिढीतील फार मोजक्याच लोकांना बीपीएल ही कंपनी माहिती नसेल. रंगीत टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे घराघरात पोहोचविणाऱ्या याच बीपीएल कंपनीचे संस्थापक टीपी गोपालन नांबियार यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचे नांबियार हे सासरे आहेत. 

नांबियार यांच्या निधनावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुराप्पा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. गेल्या काही काळापासून नांबियार आजारी होते. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे नांबियार कुटुंबातील सदस्याने सांगितले. 

ब्रिटीश फिजिकल लॅबोरेटरीजची सुरुवात १९६३ मध्ये करण्यात आली होती. केरळच्या पलक्कडमध्ये नांबियार यांनी या कंपनीची स्थापना केली होती. सुरुवातीला संरक्षण दलासाठी त्यांनी पॅनल मीटर तयार केले होते. यानंतर कंपनी आरोग्य क्षेत्रासाठी इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आणि आरोग्य सेवेशी संबंधीत उपकरणे बनविली. १९८२ मध्ये आशियाई खेळांवेळी रंगीत टीव्ही या कंपनीने लाँच केला होता. यावेळी कंपनीने थोडे थोडके नव्हे तर १० लाख टीव्ही युनिट विक्री केले होते. यानंतर फ्रिज, गॅस स्टोव्ह, व्हॅक्युम क्लीनरसारखी उत्पादने या कंपनीने बाजारात आणली. आता ही कंपनी अजित नांबियार चालवितात. 
 

Web Title: Founder of BPL, which once brought color TV to homes, tp gopalan nambiar passes away; TP Gopalan Nambiar behind the curtain of black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.