Join us

बॅंक ऑफ महाराष्ट्रसह चार बॅंकांची होणार विक्री?, नव्या आर्थिक वर्षात हाेणार प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 07:01 IST

Four banks, including Bank of Maharashtra, will be sold? : बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांचे पुढच्या टप्प्यात खासगीकरण करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने खासगीकरणाच्या पुढच्या टप्प्यात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकाकडे माेर्चा वळविला आहे. सरकारने चार बॅंकांची नावे निश्चित केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांचे पुढच्या टप्प्यात खासगीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी दाेन बॅंकांची नव्या आर्थिक वर्षात विक्री करण्यात येण्याची शक्यता आहे. या बॅंकाच्या खासगीकरणाबाबत यापूर्वी चर्चा नव्हती. सध्या आयडीबीआय बॅंकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. सध्या सरकारने मध्यम स्तरीय बॅंकांच्या खासगीकरणाचा विचार केला आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील टप्प्यात काही माेठ्या बॅंकांचीही विक्री करण्यात येईल. बॅंका ऑफ इंडियामध्ये सुमारे ५० हजार, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये सुमारे ३३ हजार, इंडियन ओव्हरसीज बॅंकेत २६ हजार आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रात १३ हजार कर्मचारी आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :बँक ऑफ महाराष्ट्रबँक