Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकिंग लोकपालांकडे पावणे चार लाख तक्रारी

बँकिंग लोकपालांकडे पावणे चार लाख तक्रारी

गेल्या पाच आर्थिक वर्षात देशभरातील १५ बँकिंग लोकपाल कार्यालयाकडे ३,७०,५४३ तक्रारी करण्यात आल्या. त्यापैकी ६१ टक्क्यांपेक्षा अधिक तक्रारी सार्वजनिक

By admin | Published: March 15, 2015 11:52 PM2015-03-15T23:52:51+5:302015-03-15T23:52:51+5:30

गेल्या पाच आर्थिक वर्षात देशभरातील १५ बँकिंग लोकपाल कार्यालयाकडे ३,७०,५४३ तक्रारी करण्यात आल्या. त्यापैकी ६१ टक्क्यांपेक्षा अधिक तक्रारी सार्वजनिक

Four lakh complaints to the Banking Ombudsman | बँकिंग लोकपालांकडे पावणे चार लाख तक्रारी

बँकिंग लोकपालांकडे पावणे चार लाख तक्रारी

नवी दिल्ली : गेल्या पाच आर्थिक वर्षात देशभरातील १५ बँकिंग लोकपाल कार्यालयाकडे ३,७०,५४३ तक्रारी करण्यात आल्या. त्यापैकी ६१ टक्क्यांपेक्षा अधिक तक्रारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांविरुद्ध होत्या. या दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांविरुद्ध २,२६,२४२ तक्रारी करण्यात आल्या होत्या.
माहिती अधिकारातहत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार २००९-१० ते २०१३-१४ या कालावधीत बँकिंग लोकपाल कार्यालयाकडे खाजगी क्षेत्रातील बँकांविरुद्ध ८७,८५३ तक्रारी आल्या होत्या, तर विदेशी बँकांविरुद्ध ३३,४७४ तक्रारी होत्या. इतर बँकांविरुद्ध २२,९७४ तक्रारी होत्या.
खाजगी क्षेत्रातील फेडरल बँक लिमिटेडविरुद्ध ११४८, आयएनजी वैश्य बँक लिमिटेडविरुद्ध १८८०, अ‍ॅक्सिस बँकेविरुद्ध १२६३१, एचडीएफसी बँकेविरुद्ध २८०७३ आणि आयसीआयसीआय बँकेविरुद्ध ३२०९० तक्रारी आल्या.
विदेशी बँकांपैकी अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्पविरुद्ध ३७७ आणि सिटी बँक एन ए विरुद्ध ५२७१ तक्रारी मिळाल्या.

Web Title: Four lakh complaints to the Banking Ombudsman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.