नवी दिल्ली : सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील चार बँकांनीही आधार दरात कपात केल्याने विविध प्रकारचे कर्ज स्वस्त होईल. आधार दरात कपात करणाऱ्या बँकांत अलाहाबाद बँक, स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर, यस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचा समावेश असून या बँकांनी आधार दरात पाव टक्का (०.२५ टक्के) कपात केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी पतधोरणाचा आढावा घेताना रेपो रेटमध्ये अर्धा टक्का कपात करून आश्चर्याचा धक्का दिला होता. स्टेट बँक आॅफ इंडियाने सर्वप्रथम आधार दरात कपात केल्यानंतर इतर बँकांनीही त्याच वाटेने पाऊल टाकणे सुरू केले. पंजाब नॅशनल बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, आंध्र बँक, आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक आणि ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सने आधार दरात कपात करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
कोटक महिंद्रा बँकेने आधार दरात पाव टक्का कपात करून तो ९.५० टक्के केला आहे.
आणखी चार बँकांनी केली आधार दरात कपात
सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील चार बँकांनीही आधार दरात कपात केल्याने विविध प्रकारचे कर्ज स्वस्त होईल. आधार दरात कपात
By admin | Published: October 1, 2015 10:15 PM2015-10-01T22:15:21+5:302015-10-01T22:15:21+5:30