Lokmat Money > बिझनेस न्यूज > सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी

सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी

जागतिक बाजारात असलेला उठाव आणि स्थानिक सराफांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे सलग चौथ्या दिवशी बुधवारी सोने १०० रुपयांनी वधारून २७,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले.

By admin | Published: February 4, 2016 03:12 AM2016-02-04T03:12:38+5:302016-02-04T03:12:38+5:30

जागतिक बाजारात असलेला उठाव आणि स्थानिक सराफांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे सलग चौथ्या दिवशी बुधवारी सोने १०० रुपयांनी वधारून २७,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले.

On the fourth day in a row, gold rose sharply | सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी

सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी

नवी दिल्ली : जागतिक बाजारात असलेला उठाव आणि स्थानिक सराफांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे सलग चौथ्या दिवशी बुधवारी सोने १०० रुपयांनी वधारून २७,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले.
त्याचबरोबर औद्योगिक प्रकल्प आणि नाणे उत्पादकांकडून मागणी वाढल्याने चांदीही १८० रुपयांनी वधारली. त्यामुळे चांदीने ३५ हजारांचा पल्ला ओलांडून ३५,०५० रुपये असा भाव गाठला. जागतिक बाजारात सोन्याला बरीच मागणी होती. त्यातच देशात आता लग्नाचा हंगाम सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफांनी सोन्याची खरेदी केल्याने भाव चढे राहिले. जागतिक स्तरावर न्यूयॉर्क येथे सोने ०.०९ टक्क्यांनी वाढून १,१२९.०० अमेरिकी डॉलर प्रति औंस झाले. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याने सोन्याची आयात महागली. दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव १०० रुपयांनी वधारून अनुक्रमे २७,४०० आणि २७,२५० रुपये प्रति १० ग्रॅम झाले.

Web Title: On the fourth day in a row, gold rose sharply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.