नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर आता अनेक चमत्कारिक परिस्थिती निर्माण होत आहेत. जगातील सर्वात मोठी उत्पादन कंत्राटदार कंपनी फॉक्सकॉनला आंध्र प्रदेश सरकारकडून जीएसटीचा १००० कोटीचा परतावा हवा आहे, परंतु राज्य सरकारजवळ तेवढी रक्कमच नाही.
फॉक्सकॉनचा आंध्र प्रदेशातील कारखाना मोबाईल फोन्सचे उत्पादन करतो. मोबाइल फोनवर १२ टक्के तर फोनच्या सुट्या भागांवर १८ टक्के जीएसटी लागतो. फॉक्सकॉनने सुट्या भागांवर जीएसटीचा भरणा केला व मोबाईल फोनवरील जीएसटी भरण्यासाठी इनपुट टॅक्स क्रेडिट (सुट्या भागावर भरलेल्या वाढीव कराचा) परतावा मागितला. तो परतावा १००० कोटींचा आहे.
परंतु आंध्र सरकारने फॉक्सकॉन कंपनीकडून मिळालेल्या जीएसटीची अर्धी रक्कम नियमानुसार केंद्र सरकारच्या खात्यात जमा केली आहे. त्यामुळे फॉक्सकॉनला परतावा देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारजवळ पुरेशी रक्कम नाही. याबाबत फॉक्सकॉनने नुकतेच केंद्राला पत्र लिहून हा तिढा लवकरात लवकर सोडविण्याची विनंती केली आहे.
फॉक्सकॉनला हवा १०० कोटींचा जीएसटी परतावा; आंध्र सरकारकडे रक्कमच नाही
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर आता अनेक चमत्कारिक परिस्थिती निर्माण होत आहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 04:10 AM2019-01-31T04:10:09+5:302019-01-31T04:10:25+5:30