Lokmat Money > बिझनेस न्यूज > Foxconn भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प सुरू करणार? हा आहे संपूर्ण प्लॅन

Foxconn भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प सुरू करणार? हा आहे संपूर्ण प्लॅन

Foxconn EV Factory: फॉक्सकॉन लवकरच भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 10:32 AM2023-06-16T10:32:51+5:302023-06-16T10:36:42+5:30

Foxconn EV Factory: फॉक्सकॉन लवकरच भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Foxconn to start electric vehicle project in India this is the complete plan Foxconn EV Factory may start soon | Foxconn भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प सुरू करणार? हा आहे संपूर्ण प्लॅन

Foxconn भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प सुरू करणार? हा आहे संपूर्ण प्लॅन

फॉक्सकॉन लवकरच भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. आयफोन बनवण्यासाठी ओळखली जाणारी फॉक्सकॉन कंपनी लवकरच भारताच्या ईव्ही मार्केटमध्येही प्रवेश करू शकते. यासाठी कंपनीने संपूर्ण योजना तयार केली आहे. तैवानची दिग्गज इलेक्ट्रिक कंपनी फॉक्सकॉन आयफोननंतर भारतात इलेक्ट्रॉनिक वाहने बनवण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत फॉक्सकॉन भारतात गुंतवणूक करण्याचा मार्गही शोधत आहे.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या वार्षिक अहवालात कंपनीनं यावर्षी भारतात एक आणखी उत्पादन प्रकल्प सुरू करणार असल्याचं म्हटलं होतं. कंपनी इलेक्ट्रीक टू व्हिलरचं उत्पादन सुरू करणार आहे. याद्वारे कंपनी आग्नेय आशियातील टू व्हिलर मार्केट कव्हर करणार आहे.

हा आहे कंपनीचा प्लॅन
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, फॉक्सकॉन समुहानं फोन व्यतिरिक्त ग्राहकांसाठी अन्य क्षेत्रातील उत्पादनातही रस दाखवला आहे. ज्या अंतर्गत आता कंपनी व्हिएतनाम आणि इंडोनेशिया सारख्या देशांच्या मदतीनं भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करण्याचा विचार करत आहे. जर सर्व बाबी योजनेनुसार पार पडल्या तर कंपनी या ठिकाणी ईव्ही सेंटरही सुरू करेल. यासाठी कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांची सपोर्टिंग कंपनी फॉक्सट्रॉनशीही चर्चा केली आहे. याशिवाय इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या एथर एनर्जीशीही कंपनीनं चर्चा केली आहे.

फॉक्सकॉननं नवीन सेगमेंटमध्ये पाऊल ठेवण्यासाठी आधीच तयारी पूर्ण केली आहे. गेल्या वर्षीच, कंपनीनं इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात उत्पादन सुरू करण्यासाठी अमेरिकेत एक जागा खरेदी केली होती. नंतर, हायब्रीड ईव्ही ब्रँड फिस्करच्या प्रकल्पांचाही ते वापर करणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांतील अधिकाऱ्यांनी ईव्ही उत्पादनाबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या वर्षी फॉक्सकॉनच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

Web Title: Foxconn to start electric vehicle project in India this is the complete plan Foxconn EV Factory may start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.