Join us

फॉक्सकॉन भारतात मोठी गुंतवणूक करणार? १० अब्ज डॉलरची वार्षिक उलाढाल साध्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 06:18 IST

भारतात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आहे.

नवी दिल्ली : भारतात प्रकल्प सुरू करण्यासाठी आपल्या योजनांना पूर्वी रूप प्राप्त करून देण्यासाठी असणारी आवश्यक स्थिती अपेक्षित असल्याचे मत तैवानच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादन कंपनी फॉक्सकॉनने व्यक्त केले आहे. अब्जावधी डॉलर त्यासाठी गुंतवणूक करणे अपेक्षित असून, तशी शक्यता दिसून येत असल्याचेही मत होन हाय टेक्नॉलॉजी ग्रुपचे (फॉक्सकॉन) अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यंग लियू यांनी व्यक्त केले आहे. 

एप्रिल-जून या कालावधीतील आर्थिक फलश्रुतींवर चर्चा करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. फॉक्सकॉनच्या भारतातील कंपनीने १० अब्ज डॉलरचा वार्षिक उलाढालीचा आकडा साध्य केला असून, या स्थितीमुळे भारतात व्यापक अशा गुंतवणुकीची शक्यता आहे.  फॉक्सकॉनचा वार्षिक महसूल हा २०० अब्ज डॉलर राहिला आहे. भारतीय बाजाराचा विचार करता आम्ही तेथे आमच्या योजनांना पूर्णपणे कार्यान्वित करू शकतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

तशी गुंतवणूक केली तर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक ही केवळ सुरुवात असेल. सध्या फॉक्सकॉन भारतात नऊ ठिकाणी प्रकल्प करीत असून भारतात वार्षिक उलाढाल सुमारे १० अब्ज डॉलर इतकी आहे. गुंतवणूकदारांकडून आमच्या संबंधात विचारणा होत असल्याबद्दल यंग लियू म्हणाले की, याचा अर्थ भारतात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आहे. (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :व्यवसाय