Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bharat FIH IPO : Nokia, Xiaomi साठी मोबाईल तयार करणारी कंपनी आणणार आयपीओ, गुंतवणूकदार होणार मालमाल!

Bharat FIH IPO : Nokia, Xiaomi साठी मोबाईल तयार करणारी कंपनी आणणार आयपीओ, गुंतवणूकदार होणार मालमाल!

Bharat FIH IPO :  भारत एफआयएचला देखील आयपीओ आणण्यासाठी शेअर बाजार नियामक सेबीकडून (SEBI) मंजुरी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 16:32 IST2022-06-18T14:49:15+5:302022-06-18T16:32:43+5:30

Bharat FIH IPO :  भारत एफआयएचला देखील आयपीओ आणण्यासाठी शेअर बाजार नियामक सेबीकडून (SEBI) मंजुरी मिळाली आहे.

Foxconn's Bharat FIH gets Sebi nod to float Rs 5000 cr IPO | Bharat FIH IPO : Nokia, Xiaomi साठी मोबाईल तयार करणारी कंपनी आणणार आयपीओ, गुंतवणूकदार होणार मालमाल!

Bharat FIH IPO : Nokia, Xiaomi साठी मोबाईल तयार करणारी कंपनी आणणार आयपीओ, गुंतवणूकदार होणार मालमाल!

नवी दिल्ली : मोबाईल हँडसेट उत्पादक कंपनी भारत एफआयएच (Bharat FIH) लवकरच आपला आयपीओ (IPO) आणणार आहे. आयपीओद्वारे 5,000 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.  भारत एफआयएचला देखील आयपीओ आणण्यासाठी शेअर बाजार नियामक सेबीकडून (SEBI) मंजुरी मिळाली आहे.

सेबीकडून ग्रीन सिग्नल 
भारत एफआयएचच्या (Bharat FIH) आयपीओमध्ये 2,502 कोटी रुपयांचा नवीन इश्यू असेल. तसेच, प्रोमोटर्सद्वारे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून 2502 कोटी उभारले जातील. भारत एफआयएचने डिसेंबर 2021 मध्ये आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला होता. त्यानंतर सेबीने कंपनीला आयपीओ आणण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.

कंपनी Xiaomi आणि Nokia साठी बनवते मोबाईल हँडसेट 
भारत एफआयएच (Bharat FIH) शाओमी (Xiaomi) आणि नोकिया (Nokia) साठी मोबाईल हँडसेट तयार करते. ही कंपनी फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप (Foxconn Technology Group)आणि एफआयएच मोबाईल्सची (FIH Mobiles) उपकंपनी आहे. सध्या वंडरफुल स्टार्सकडे (Wonderful Stars) कंपनीत 99.97 टक्के हिस्सा आहे. कंपनी आयपीओद्वारे उभारलेला पैसा आपल्या विस्तार आणि भांडवली खर्चात खर्च करेल.
 

Web Title: Foxconn's Bharat FIH gets Sebi nod to float Rs 5000 cr IPO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.