Lokmat Money > बिझनेस न्यूज > परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे का फिरवली पाठ? 85 हजार कोटी रुपये घेतले काढून

परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे का फिरवली पाठ? 85 हजार कोटी रुपये घेतले काढून

FPI Selling : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 03:11 PM2024-10-27T15:11:35+5:302024-10-27T15:11:35+5:30

FPI Selling : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली होती.

fpi continued selling in the indian market pulling out a massive ten billion dollar in october | परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे का फिरवली पाठ? 85 हजार कोटी रुपये घेतले काढून

परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे का फिरवली पाठ? 85 हजार कोटी रुपये घेतले काढून

FPI Selling : सप्टेंबर महिन्यात ऐतिहासिक पातळीवर पोहचलेल्या भारतीय शेअर बाजाराला परदेशी गुंतवणूकदारांची नजर लागली, असेच म्हणावे लागेल. कारण, ऑक्टोबर महिना सुरू झाला आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे बाजार कोसळत चालला आहे. गेल्या आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी सर्वात वाईट व्यापार आठवडा होता, बाजारात प्रचंड विक्री दिसून आली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढत असताना, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून (FPIs) मोठ्या प्रमाणावर निधीची विक्री होत आहे. या महिन्यात आतापर्यंत, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून ८५,७९० कोटी रुपये काढून घेतले आहेत.

परदेशी गुंतवणूकदारांनी का फिरवली पाठ?
काही दिवसांपूर्वी चीन सरकारने व्याजदर कपात करुन आर्थिक पॅकेज जाहिर केले होते. तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजार ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर चालला होता. यामुळे परदेशी गुंतवणूकदार बाजारातून पैसा काढून घेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये, FPIs ने भारतीय शेअर बाजारात ५७,७२४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जी ९ महिन्यांतील त्यांच्या गुंतवणुकीची सर्वोच्च पातळी आहे. आकडेवारीनुसार, १ ते २५ ऑक्टोबर दरम्यान FPIs ने भारतीय शेअर बाजारातून ८५,७९० कोटी रुपये काढले आहेत. या कृतीमुळे भारतीय शेअर बाजार वेगाने कोसळत आहे.

ऑक्टोबर महिना सर्वात वाईट 
परकीय निधीतून पैसे काढण्याच्या दृष्टीने ऑक्टोबर महिना सर्वात वाईट ठरत आहे. मागील वाईट महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, मार्च २०२० मध्ये, FPIs ने शेअर्समधून ६१,९७३ कोटी रुपये काढले होते. या वर्षी आतापर्यंत FPIs ने शेअर्समध्ये १४,८२० कोटी रुपये आणि डेट किंवा बाँड मार्केटमध्ये १.०५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची जूनपासून सतत खरेदी
डिपॉझिटरी डेटानुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार जून २०२४ पासून देशांतर्गत शेअर बाजारात सतत खरेदी करत होते. एप्रिल-मे मध्ये त्यांनी निश्चितपणे ३४,२५२ कोटी रुपयांचा निधी काढला होता.

बाजार तज्ञ काय म्हणतात?
भारतीय बाजारपेठेतील FPI गुंतवणूक भू-राजकीय परिस्थिती आणि व्याजदरातील चढ-उतार यासारख्या जागतिक गुंतवणुकीवर अवलंबून असेल. देशांतर्गत आघाडीवर एफपीआय महागाईचा कल, कंपन्यांचे तिमाही निकाल आणि सणासुदीच्या सत्राची मागणी यावर FPI चे लक्ष असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: fpi continued selling in the indian market pulling out a massive ten billion dollar in october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.