नवी दिल्ली : केंद्र सरकारने ई-वाहनांना प्राेत्साहन देण्यासाठी ‘फेम’ याेजना सुरू केली हाेती. मात्र, ई-दुचाकी बनविणाऱ्या काही कंपन्यांनी फसवणूक केल्यामुळे ही याेजना गुंडाळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशा प्रकरणांमध्ये सरकारने कंपन्यांचे अनुदान आधीच राेखले आहे.
‘फेम’ याेजनेंतर्गत या कंपन्या देशात उत्पादित गाड्यांवर ग्राहकांना ४० टक्के सवलत देऊ शकत हाेत्या. ही सवलत कंपन्यांना अनुदानाच्या स्वरूपात परत मिळते. मात्र, कंपन्यांनी घाेटाळा केल्यानंतर सरकारने ही याेजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.दुसऱ्या टप्प्यात करणार सुधारणा दुसऱ्या टप्प्यात १० लाख दुचाकी व सात हजार बसेसना प्राेत्साहन देण्याची याेजना आहे. याेजना आता पीएलआय याेजनेद्वारे बदलण्यात येणार आहे. आधी विक्रीच्या टप्प्यात अनुदान देण्यात येत हाेते. आता तसे हाेणार नाही. उत्पादनाच्या टप्प्यातच अनुदान देण्यात येणार आहे.
२६ हजार काेटींचे वाटपसरकारतर्फे पीएलआय याेजनेंतर्गत वाहन उद्याेगाला २५ हजार ९३८ काेटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी आतापर्यंत ११५ कंपन्यांनी अर्ज केले आहेत.