जाणून घ्या, काय असतात व्हिशिंग लिंक्स
बँक किंवा विमा कंपनीतून फोन असल्याचे दाखवून आपल्याकडील माहिती उकळून घेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. भोळे आणि आर्थिक व्यवहारांची अधिक माहिती नसलेल्यांना या जाळ्यात अडकतात आणि मग लाखो रुपयांना गंडा घातला जातो. अशा प्रकारला व्हिशिंग लिंक्स म्हणतात. जाणून घ्या नेमकं काय असतं हे...
मोडस ऑपरेंडी काय?
या प्रकारात गुन्हेगार एखाद्या बँकेतील अधिकारी, वित्तीय कंपनीचा अधिकारी, विमा प्रतिनिधी, सरकारी कर्मचारी वा तत्सम पदावरील अधिकारी बोलत असल्याचे सांगत ग्राहकाला फोन करतात.
फोनवरून ग्राहकाला त्याचे नाव, जन्मतारीख, पत्ता असे सांगत त्याच्या बँक तपशिलाविषयी माहिती विचारतात.
काही प्रकारांत तुमच्या अकाऊंटवरून काही रक्कम वळती झाली आहे ती ब्लॉक करण्यासाठी तुमचा पिन सांगा वगैरे अशी तातडीची मागणी केली जाते.