नवीन वर्षात एटीएमशी संबंधीत नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. रिझर्व्ह बँकेनेएटीएमच्या मोफत व्यवहारांची लिमिट संपली की आकारल्या जाणाऱ्या शुल्कामध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे तुमची बँक जेवढे मोफत ट्रान्झेक्शन करण्याची संधी देते त्यापेक्षा जास्त वेळा एटीएम ट्रान्झेक्शन केल्यास तुम्हाला हे शुल्क द्यावे लागणार आहे. (ATM Transaction Charge) मात्र, तुम्ही या शुल्काला चकमा देऊ शकता आणि पैसे काढू शकता. अशाप्रकारे पैसे काढल्यास तुम्हाला कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही.
तुम्ही मायक्रो एटीएम (Micro Atm) आणि आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टिम (Aadhaar Enabled Payment System) द्वारे तुम्ही पैसे काढू शकता. नवीन वर्ष म्हणजे १ जानेवारीपासून एटीएममधून कॅश काढणे महागले आहे. अद्याप लोकांचे ही फ्री लिमिट संपलेले नाही. त्यामुळे आता लोकांना मोजून मापून एटीएम वापरावे लागणार आहे. याआधी कॅश आणि नॉन कॅश ट्रान्झेक्शनची मोफत लिमिट संपली की २० रुपये प्रत्येक ट्रान्झेक्शनला चार्ज आकारला जायाचा. तो वाढून आता २१ रुपये आणि जीएसटी असा झाला आहे.
मायक्रो एटीएम काय आहे...एटीएम शुल्काचा परिणाम मायक्रो एटीएमवर होत नाही. यामुळे तुम्ही त्याद्वारे पैसे काढू शकता. पण मायक्रो एटीएम म्हणजे काय हे आधी तुम्हाला माहिती असायला हवे. मायक्रो एटीएम म्हणजे दुकानांमध्ये असलेल्या पीओएस मशीन. परंतू तुम्ही याद्वारे पैसे सहजसहजी काढू शकत नाहीत. म्हणजेच प्रत्येक दुकानात काढू शकत नाही. काही बँकांनी मायक्रो एटीएमवर पैसे काढण्याची सुविधा काही दुकानांमध्ये दिलेली आहे, त्याच ठिकाणी तुम्ही पैसे काढू शकता. अन्य ठिकाणी दुकानदार ओळखीचा असला तर तुम्ही पैसे काढू शकता.
आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टिम...तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आधारवर आधारित पेमेंट सिस्टिमचा वापर करून निशुल्क पैसे काढू शकता. आरबीआयचा नवा नियम यावर देखील लागू होत नाही. बँका किंवा अन्य आर्थिक संस्था तुमची फिंगरप्रिंच आणि मोबाईल नंबरच्या मदतीने पैसे काढून देतात. एनपीसीआयने ही सुविधा तयार केली आहे. यासाठी युआयडीएआयद्वारे ऑथेंटिकेशन प्राप्त होते. यासाठी डेबिट, क्रेडिट कार्डची गरज नाही. मात्र, तुमचे खाते तुमच्या आधारशी लिंक असायला हवे. ही मशीन देखील स्वाईप मशीनसारखीच असते.
संबंधीत बातमी...