Join us  

Free Gas Cylinder: कोट्यवधी लोकांना लागली लॉटरी! मिळणार 2 मोफत गॅस सिलिंडर, 'या' राज्यातील सरकारनं केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 2:35 PM

केंद्र आणि राज्य सरकारकडून उज्जवला योजना चालविली जात आहे. ज्या अंतर्गत सरकार फ्री गॅस सिलिंडर आणि यावर सब्सिडीची सुविधाही देत आहे.

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरात वाढत चाललेल्या गॅसच्या किमतींमुळे आपणही त्रस्त झाले असाल, तर आता टेन्शन घेण्याचे कारण नाही. यावेळी, होळीच्या दिवशी सरकार आपल्याला 2 गॅस सिलिंडर मोफत देण्यासंदर्भात प्लॅन आखत आहे. हो हे खरे आहे... केंद्र आणि राज्य सरकारकडून उज्जवला योजना चालविली जात आहे. ज्या अंतर्गत सरकार फ्री गॅस सिलिंडर आणि यावर सब्सिडीची सुविधाही देत आहे.

अन्न पुरवठा विभागाने दिली माहिती -ही सुविधा उत्तर प्रदेशात राहणाऱ्या लोकांना राज्य सरकारकडून मिळणार आहे. उत्तर प्रदेशातील अन्न आणि पुरवठा विभागाने मोफत गॅस सिलिंडर देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडेही पाठवला आहे. यानंतर, सरकारकडून बजेट मिळाल्यानंतरच मोफत गॅस सिलिंडर वाटायला सुरुवात करता येईल.

होळीच्या दिवशी मिळणार पहिले गॅस सिलिंडर - भाजप सरकार युपीमध्ये निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेंतर्गत, यावेळी होळीच्या दिवशी आपल्याला पहिले मोफत सिलिंडर मिळेल. तर दिवाळीला दुसरे मोफत गॅस सिलिंडर मिळेल.

1.65 कोटी लाभार्थ्यांना होणार फायदा -राज्य सरकारच्या या मोफत सिलिंडरच्या सुविधेचा फायदा देशभरातील जवळपास 1.65 कोटी लाभार्थ्यांना मिळेल. महत्वाचे म्हणजे, फ्री सिलिंडरसाठी सरकारवर जवळपास 3000 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडेल. 

टॅग्स :गॅस सिलेंडरउत्तर प्रदेशसरकार