Lokmat Money > बिझनेस न्यूज > JioHotstar Free Subscription: IND vs NZ फायनल पाहण्यासाठी एक्स्ट्रा पैसे खर्च करण्याची गरज नाही, ‘या’ प्लानमध्ये फ्री मिळतंय जिओहॉटस्टार 

JioHotstar Free Subscription: IND vs NZ फायनल पाहण्यासाठी एक्स्ट्रा पैसे खर्च करण्याची गरज नाही, ‘या’ प्लानमध्ये फ्री मिळतंय जिओहॉटस्टार 

Free Live Streaming IND vs NZ Champions Trophy 2025 Final: चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अंतिम सामना तुम्ही कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता पाहू शकता. कोणत्या प्लान्समध्ये तुम्हाला नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे, त्याबद्दल जाणून घेऊ.

By जयदीप दाभोळकर | Updated: March 6, 2025 11:39 IST2025-03-06T11:38:16+5:302025-03-06T11:39:18+5:30

Free Live Streaming IND vs NZ Champions Trophy 2025 Final: चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अंतिम सामना तुम्ही कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता पाहू शकता. कोणत्या प्लान्समध्ये तुम्हाला नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे, त्याबद्दल जाणून घेऊ.

free Jio Hotstar subscription reliance jio vodafone idea plan you can watch ind vs nz champions trophy final for free | JioHotstar Free Subscription: IND vs NZ फायनल पाहण्यासाठी एक्स्ट्रा पैसे खर्च करण्याची गरज नाही, ‘या’ प्लानमध्ये फ्री मिळतंय जिओहॉटस्टार 

JioHotstar Free Subscription: IND vs NZ फायनल पाहण्यासाठी एक्स्ट्रा पैसे खर्च करण्याची गरज नाही, ‘या’ प्लानमध्ये फ्री मिळतंय जिओहॉटस्टार 

IND vs NZ, Final Free Live Streaming: डिस्ने+ हॉटस्टार आणि जिओनं नुकताच आपला नवा ओटीटी प्लॅटफॉर्म 'जिओहॉटस्टार' (JioHotstar) लाँच केला आहे. या दोन ओटीटी प्लॅटफॉर्मच्या विद्यमान ग्राहकांचे प्लान संपेपर्यंत मेंबरशीप सुरू राहणार आहे. जिओ आणि व्होडाफोन आयडियानं नुकतेच नवे प्रीपेड प्लान सादर केले आहेत ज्यात जिओ हॉटस्टार सब्सक्रिप्शन मोफत (JioHotstar Subscription Free) दिले जातं. चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अंतिम सामना तुम्ही कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता पाहू शकता. कोणत्या प्लान्समध्ये तुम्हाला नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे, त्याबद्दल जाणून घेऊ.

रिलायन्स जिओहॉटस्टार प्लान्स (Reliance JioHotstar plans)

जिओचे यापूर्वीही असे अनेक प्लॅन आहेत ज्यात जिओसिनेमाचा अॅक्सेस मोफत मिळत होता. सध्या जिओकडे असे दोनच रिचार्ज आहेत जे नवीन ओटीटी जिओहॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन देतात.

१९५ रुपयांचा रिलायन्स जिओ चा प्लान

नुकत्याच लाँच झालेल्या १९५ रुपयांच्या जिओ क्रिकेट डेटा पॅकमध्ये तीन महिन्यांसाठी जिओहॉटस्टारचं मोफत सब्सक्रिप्शन मिळतं. या प्लानमध्ये १५ जीबी ४जी/५जी डेटा मिळतो आणि ग्राहकांना अॅड-सपोर्टेड जिओ हॉटस्टार मोबाइल प्लान मिळतो. या प्लॅनमध्ये युजर्स एका वेळी केवळ एका डिव्हाइसवर एचडी रिझोल्यूशनमध्ये कंटेंट पाहू शकतात.

९४९ रुपयांचा रिलायन्स जिओ चा प्लॅन

रिलायन्स जिओचा ९४९ रुपयांचा प्लान कंपनीनं गेल्या आठवड्यात लाँच केला. या प्रीपेड प्लानची वैधता ८४ दिवसांची असून यात २ जीबी ४जी डेटा मिळतो. या रिचार्जमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड ५जी डेटा मिळतो.

जर तुमच्याकडे आधीपासूनच अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि डेली डेटा देणारा जिओ प्लॅन असेल तर १९५ रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे. पण जर तुम्ही तुमचा मोबाईल रिचार्ज करू इच्छित असाल तर तुम्ही ९४९ रुपयांचा प्लान सब्सक्राइब करू शकता.

व्होडाफोन आयडिया जिओहॉटस्टार प्लॅन (Vodafone Idea JioHostar plans)

व्होडाफोन आयडियाचे काही आकर्षक प्रीपेड प्लॅन आहेत ज्यात जिओ हॉटस्टार मेंबरशिप पूर्णपणे मोफत आहे. जर तुमच्याकडे आधीपासूनच अॅक्टिव्ह बेस प्लॅन असेल तर तुम्ही १५१ रुपयांचा अॅड-ऑन प्लॅन घेऊ शकता. या प्लॅनमध्ये ४ जीबी डेटा मिळतो आणि प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. या प्लानमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची सर्व्हिस व्हॅलिडिटी मिळणार नाही. यात ३ महिन्यांचे जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन फ्री आहे.

जर तुम्ही नॉर्मल प्रीपेड प्लान च्या शोधात असाल तर ४६९ रुपयांचा प्लान तुमच्यासाठी काम करू शकतो. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. या रिचार्जमध्ये २.५ जीबी मोबाइल डेटा मिळतो. रात्री १२ ते सकाळी १२ या वेळेत या रिचार्जमध्ये अनलिमिटेड डेटा मिळतो. पहिल्या डेटा अॅड-ऑन प्लानप्रमाणेच या प्लानमध्येही जिओ हॉटस्टार मेंबरशिप ३ महिन्यांसाठी फ्री मिळते.

जर तुम्ही ३ महिन्यांच्या वैधतेसह प्रीपेड रिचार्ज शोधत असाल तर तुम्ही ९९४ रुपयांच्या व्होडाफोन रिचार्जचं सब्सक्रिप्शन घेऊ शकता. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या रिचार्जमध्ये रात्री १२ ते सकाळी १२ या वेळेत अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज १०० एसएमएस, दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड मोबाइल डेटा मिळतो.

व्होडाफोन आयडियाच्या सर्वात महागड्या प्रीपेड प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार मोफत ऑफर केलं जातं. या रिचार्जची किंमत ३,६९९ रुपये आहे. या रिचार्जमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज १०० एसएमएस व्यतिरिक्त दररोज २ जीबी डेटा देखील मिळतो. जर तुम्हाला एक वर्षासाठी जिओहॉटस्टार मेंबरशिप हवी असेल तर व्हीआयचा हा प्लॅन तुमच्यासाठी आहे.

Web Title: free Jio Hotstar subscription reliance jio vodafone idea plan you can watch ind vs nz champions trophy final for free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.