Join us  

फ्री सॅम्पल, परदेश दौरे आणि डॉक्टर्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 5:27 AM

Tax : नुकतेच आयकर विभागाने कलम 194R बाबतचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात काय तपशील आहेत? 

- उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउंटंट अर्जुन : कृष्णा,  नुकतेच आयकर विभागाने कलम 194R बाबतचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात काय तपशील आहेत? कृष्ण : कलम 194R नुसार सेवेसाठीचे अतिरिक्त फायदे रोखीने किंवा वस्तू स्वरूपात प्रदान करण्यापूर्वी अशा लाभाच्या किंवा अतिरिक्त फायद्याच्या एकूण मूल्याच्या १० टक्के रकमेइतकी कर कपात करणे आवश्यक आहे. अर्जुन : नक्की कोणती प्रकरणे, कलम 194R अंतर्गत “लाभ किंवा अतिरिक्त फायदे” म्हणून गणली जातील? कृष्ण :  194R अंतर्गत खालील प्रकरणांमध्ये टीडीएस लागू होईल : १. लाभ  म्हणून दिलेली कोणतीही मालमत्ता जसे की, कार, जमीन इ. किंवा भांडवली मालमत्ता.२. उत्पादनांचे विनामूल्य प्रदान केलेले नमुने (डॉक्टरांना दिलेले फ्री सॅम्पल).३. रोख  किंवा वस्तू स्वरुपात (सवलत, सूट या व्यतिरिक्त) दिलेले प्रोत्साहनपर फायदे.४. ठराविक लक्ष्य साध्य केल्यावर त्या व्यक्तीला/नातेवाईकाला दिलेले एखाद्या सहलीचे, कार्यक्रमाचे विनामूल्य तिकीट.अर्जुन :  कलम 194R अंतर्गत कर कपातीची गरज नसलेली कोणती प्रकरणे आहेत?कृष्ण : १. आर्थिक वर्षात  प्रदान केलेल्या लाभाचे  एकूण मूल्य वीस हजारपेक्षा जास्त नसल्यास. २. व्यक्ती/हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) ज्याची एकूण उलाढाल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही किंवा व्यवसायातून उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त नसेल, त्या व्यक्तीवर आधीच्या आर्थिक वर्षात लाभ किंवा अतिरिक्त फायद्यावर कर कपातीची जबाबदारी लागू होत नाही.३. सरकारी रूग्णालय, व्यवसाय करत नसलेल्या सरकारी संस्थेला लाभ किंवा अतिरिक्त फायदे दिले जात असल्यास.४.   विक्रेता १० वस्तूंच्या खरेदीवर २ वस्तू विनामूल्य, अशा योजनांमध्ये.५. पगारांतर्गत लाभ किंवा अतिरिक्त फायदे करपात्र असल्यास हे कलम लागू होणार नाही.

टॅग्स :कर