नवी दिल्ली : रिलायन्स जिओने १७0 दिवसांत १00 दशलक्ष म्हणजेच १0 कोटींपेक्षा जास्त ग्राहक जोडले असल्याची घोषणा कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मंगळवारी केली. १ एप्रिलपासून कंपनीची पेड सेवा सुरू होत आहे. तथापि, सध्याची मोफत व्हॉइस कॉल आणि संपूर्ण देशासाठी लागू असलेली मोफत रोमिंग सेवा १ एप्रिलनंतरही सुरूच राहणार असल्याचे अंबानी यांनी जाहीर केले. पेड सेवेत जिओ प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा २0 टक्के डाटा जास्त देणार असल्याचेही अंबानी यांनी सांगितले.
मुकेश अंबानी यांनी सांगितले की, सध्याची मोफत सेवेची योजना मार्च अखेरीस संपेल. त्यानंतर १ एप्रिलपासून कंपनीची पेड सेवा सुरू होईल. तथापि, मोफत व्हॉइस कॉलिंग आणि मोफत रोमिंगची सेवा बंद होणार नाही. याशिवाय सध्या पुरविण्यात येत असलेल्या मोफत डाटा सेवेचा लाभही ग्राहकांना अत्यल्प दरात घेता येईल. त्यासाठी कंपनीने १२ महिन्यांसाठी नवी योजना आणली आहे. ‘जिओ प्राइम मेंबरशिप’ या नावाचा हा प्लॅन मार्च २0१८ पर्यंत वैध असेल. ९९ रुपये भरून या योजनेचे सदस्यत्व ग्राहकास घेता येईल. त्यानंतर दरमहा ३0३ रुपयांच्या रिचार्जवर सध्याच्या योजनेतील डाटाचा लाभ मिळत राहील.
गेल्या वर्षी ५ सप्टेंबर रोजी जिओने दूरसंचार सेवा क्षेत्रात पाऊल टाकले होते. त्यानंतर १७0 दिवसांतच कंपनीने ४जी एलटीई नेटवर्कवर १00 दशलक्ष ग्राहक नोंद केले आहेत. या काळात कंपनीने प्रत्येक सेकंदाला सरासरी ७ ग्राहक जोडले. मुकेश अंबानी यांनी विशेष भाषणात ही माहिती दिली. त्यांचे भाषण जिओच्या सोशल मीडिया अकाउंटवर लाइव्ह दाखविण्यात आले.
कंपनीने सुरुवातीच्या तीन महिन्यांसाठी मोफत सेवा दिली होती. त्यानंतर ‘हॅपी न्यू ईअर आॅफर’ या नावाने नवी योजना ग्राहकांच्या सेवेत आणली. ही योजना पहिल्या योजनेसारखीच आहे. दररोज १ जीबी मोफत डाटा त्याअंतर्गत ग्राहकांना मिळतो. ही योजना मार्च अखेरीस संपेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
१00 कोटी जीबीचा वापर
१७0 दिवसांच्या काळात जिओच्या ग्राहकांनी २00 कोटी मिनिटांचे व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉल केले. १00 कोटी जीबी डाटा वापरला.
च्या काळातील ग्राहकांचा दररोजचा डाटा वापर सरासरी ३.३ कोटी जीबी होता. त्यामुळे भारत हा मोबाइल डाटा वापरण्याच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर आला आहे.
100
कोटी जीबीचा वापर
200
कोटी मिनिटांचे
व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉल 170 दिवसांत
जिओची मोफत सेवा मार्चनंतर संपणार
रिलायन्स जिओने १७0 दिवसांत १00 दशलक्ष म्हणजेच १0 कोटींपेक्षा जास्त ग्राहक जोडले असल्याची घोषणा
By admin | Published: February 22, 2017 12:42 AM2017-02-22T00:42:46+5:302017-02-22T00:42:46+5:30