भारत आणि ब्रिटन यांच्यात फ्री ट्रेड अॅग्रीमेंट (FTA) प्रस्तावित आहे. दोन्ही देशांमधील या करारामुळे देशांतर्गत व्हिस्की उत्पादकांची चिंता वाढली आहे. भारत आणि ब्रिटनमधील फ्री ट्रेड अॅग्रीमेंटमुळे जॉनी वॉकर ब्लॅक लेबल आणि सिवास रीगल यांसारख्या लोकप्रिय ब्रँडची शिपमेंट वाढू शकते. फ्री ट्रेड अॅग्रीमेंट आता अंतिम स्वरूपाच्या जवळ आहे. यामध्ये बाटलीबंद स्कॉचसाठी किमान आयात किंमत (MIP) समाविष्ट होणे अपेक्षित आहे. त्याच्या बाटलीबंद आणि कास्क व्हिस्की दोन्हीसाठी आयात शुल्क कमी होऊ शकते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रस्तावित FTA अंतर्गत, MIP मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या बाटलीबंद स्कॉचवरील आयात शुल्क १५० टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकते. तर कास्कवर ७५ टक्क्यांवर अर्धे शुल्क लावले जाऊ शकते. परंतु अद्याप यावर चर्चा सुरू आहे.
दोन्ही देशांदरम्यान हा करार झाल्यास त्याचा जॉनी वॉकर आणि सिवास रिगलच्या किमतींवर परिणाम होईल. त्यांच्या किंमती कमी होतील. खरं तर, या करारानंतर, भारत आणि ब्रिटनमधील जॉनी वॉकर ब्लॅक लेबल आणि सिवास रीगल यांसारख्या प्रसिद्ध ब्रँडची शिपमेंट वाढू शकते. हे फ्री ट्रेड अॅग्रीमेंट अंतिम टप्प्यात आहे. भारत आणि ब्रिटनमधील एफटीए चर्चेची ११वी फेरी नुकतीच पार पडली. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल या चर्चेसाठी लंडनला गेले होते.
किती कमी होईल किंमत?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या करारानुसार, एमआयपी मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या बाटलीबंद स्कॉचवरील आयात शुल्क १५० टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकते. कास्कवर ७५ टक्के दरानं अर्धे शुल्क आकारले जाऊ शकते. सध्या यावर चर्चा सुरू आहे. येथे या करारामुळे देशांतर्गत उद्योगांची चिंता वाढली आहे. देशांतर्गत उद्योग सर्व ७५० एमएल बाटल्यांवर ५ टक्के एमआयपीवर आग्रही आहेत. हे असे एक पाऊल आहे ज्यामुळे देशात ब्रिटनमधून स्कॉचची आयात लक्षणीयरीत्या वाढू शकते.