लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरात, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या ‘मुक्त व्यापार करार’ (एफटीए) असलेल्या देशांतून होणारी आयात २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत ३८ टक्के वाढून १८७.९२ अब्ज कोटी डॉलर झाली.
आर्थिक संशोधन संस्थान ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’च्या अहवालानुसार, एफटीए भागीदार देशांना होणारी भारताची निर्यात २०१८-१९ मध्ये १०७.२० अब्ज डॉलर होती. २०२३-२४ मध्ये ती १४.४८ टक्के वाढून १२२.७२ कोटी डॉलर झाली. आयात वित्त वर्ष २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत ३७.९७ टक्के वाढून १८७.९२ अब्ज डॉलर झाली.
‘आसियान’ सामील झाल्याने बूस्टर
भारत आणि संयुक्त अरब आमिरात यांच्यात मे २०२२ मध्ये एफटीए लागू झाला. ऑस्ट्रेलिया, जपान तसेच १० सदस्य देश असलेला आसियान समूह आणि दक्षिण कोरिया यांच्यासोबतचा व्यापारही एफटीएनंतर वाढला आहे. भारताचा जागतिक बाजारातील हिस्सा १.८ टक्के तर निर्यातीतील स्थान १७वे आहे.