नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव आहे. या कोरोना संकट काळात अनेकदा लोकांना पैशाचा तुटवडा जाणवत असतो. अशा परिस्थितीत आपण आपल्या मित्रांकडून किंवा कुटूंबाकडून पैसे उधारीने घेतो. मात्र, या व्यतिरिक्त मार्केटमध्ये बरेच पर्याय आहेत. आजकाल देशातील बर्याच कंपन्या बाय नाउ पे लेटरची (Buy Now Pay Later) सुविधा देतात. अलीकडेच, देशातील प्रमुख ई-वॉलेट कंपन्यांपैकी एक फ्रीचार्जने (Freecharge) आपल्या ग्राहकांसाठी 'पे लेटर' (Pay Later) सर्व्हिस सुरू केली आहे. याद्वारे युजर्सला कंपनी क्रेडिट लिमिट देते. युजर्स क्रेडिट लिमिटमध्ये खर्च करू शकतात आणि पुढच्या महिन्यात देय देऊ शकतात.(freecharge launches pay later for its customers)
कोठे वापरू शकतो Freecharge Pay Later?फ्रीचार्ज पे लेटर सर्व्हिसचा वापर freecharge.in किंवा फ्रीचार्ज अॅपवर वापरले जाऊ शकते. याशिवाय, कंपनीच्या 10 हजार ऑनलाईन आणि ऑफलाइन पार्टनर मर्चंटच्या नेटवर्कवरही याचा उपयोग केला जाऊ शकतो. या सर्व्हिसचा वापर करून ग्राहक फ्रीचार्ज अॅपवर कोणत्याही क्रेडिट कार्डशिवाय त्यांचे मोबाईल रिचार्ज, विजेचे बिल, डीटीएच रिचार्ज करू शकतात. तसेच, पार्टनर मर्चेंटचा अॅप किंवा साइटवर फूड ऑर्डर, औषधाच्या ऑर्डर, ऑनलाइन किराणा सामान इत्यादीसाठी करू शकतो.
हजार रुपयांपर्यंत क्रेडिट लिमिटफ्रीचार्ज पे लेटर सर्व्हिस वापरणार्या ग्राहकांना मासिक क्रेडिट लिमिट मिळते, जी 5000 रुपयांपर्यंत असू शकते. हे क्रेडिट लिमिट भविष्यात वाढू शकते. ही सर्व्हिस वापरण्यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फीस) आकारले जात नाही. एका महिन्यानंतर आपल्या बिलाच्या परतफेडीवर काही व्याज आकारले जाते. मात्र, कंपनी फ्रीचार्ज वॉलेटमधील कॅशबॅकच्या स्वरूपात हे व्याज परत करते.