नवी दिल्ली : ‘ॲमेझाॅन’चे संस्थापक जेफ बेझाेस हे आता जगातील सर्वांत श्रीमंत्र व्यक्ती राहिलेले नाहीत. बेझाेस यांना मागे टाकून लुई वीटाॅनचे मालक बर्नार्ड अर्नाल्ट हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी बेझाेस यांच्यासह ‘टेस्ला’चे एलाॅन मस्क यांनाही मागे टाकले हे.
फाेर्ब्सच्या रिअल टाइन अब्जाधीशांच्या यादीत अर्नाल्ट यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे १९८.९ अब्ज डाॅलर्सची संपत्ती आहे, तर १९४.९ अब्ज डाॅलर्सची संपत्ती असलेले जेफ बेझाेस हे दुसऱ्या स्थानावर गेले आहेत. तिसऱ्या स्थानी असलेले एलाॅन मस्क यांच्याकडे १८५.५ अब्ज डाॅलर्सची संपत्ती आहे. बऱ्याच कालावधीपासून बेझाेस आणि मस्क यांच्यात पहिल्या स्थानासाठी चढाओढ दिसत हाेती.
काेण आहेत अर्नाल्ट?
७२ वर्षीय बर्नार्ड अर्नाल्ट हे फ्रेंच उद्याेजक आहेत. ‘लुई वीटाॅन माएट हेनेसी’ या जगप्रसिद्ध फॅशन ब्रँडचे ते मालक आहेत. अर्नाल्ट यांच्याकडे ७० ब्रँडस् आहेत. त्यात लुई वीटाॅन, मार्क जेकब्स, केंजाे, स्टेला मेकार्टनी फेंडी, गुस्सी ख्रिश्चियन डायर, गिवेंची आणि सेफाेरा यासारख्या ब्रँडस्चा समावेश आहे.