Lokmat Money > बिझनेस न्यूज > Thank you, Thalaivaa!... सुपरस्टार रजनीकांतच्या 'सुपरफॅन'चा १० कोटी डॉलर्सच्या IPO साठी अर्ज

Thank you, Thalaivaa!... सुपरस्टार रजनीकांतच्या 'सुपरफॅन'चा १० कोटी डॉलर्सच्या IPO साठी अर्ज

Freshworks IPO : कंपनीच्या संस्थापकानं IPO साठी केलेल्या अर्जातही रजनीकांत यांच्याबद्दल लिहिलं आहे. कंपनीचे फाऊंडर आहेत रजनिकांत यांचे 'जबरा फॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 06:36 PM2021-08-28T18:36:32+5:302021-08-28T18:38:17+5:30

Freshworks IPO : कंपनीच्या संस्थापकानं IPO साठी केलेल्या अर्जातही रजनीकांत यांच्याबद्दल लिहिलं आहे. कंपनीचे फाऊंडर आहेत रजनिकांत यांचे 'जबरा फॅन'

Freshworks files for 100 million dollar IPO founder thanks superstar actor Rajinikanth said Thank you Thalaivaa | Thank you, Thalaivaa!... सुपरस्टार रजनीकांतच्या 'सुपरफॅन'चा १० कोटी डॉलर्सच्या IPO साठी अर्ज

Thank you, Thalaivaa!... सुपरस्टार रजनीकांतच्या 'सुपरफॅन'चा १० कोटी डॉलर्सच्या IPO साठी अर्ज

Highlightsकंपनीच्या संस्थापकानं IPO साठी केलेल्या अर्जातही रजनीकांत यांच्याबद्दल लिहिलं आहे. कंपनीचे फाऊंडर आहेत रजनिकांत यांचे 'जबरा फॅन'

Freshworks IPO : कस्टमर सर्व्हिस मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म सारखी सेवा देणारी Freshworks ही कंपनी आपला IPO आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं अमेरिकेत १० कोटी डॉलर्स म्हणजे जवळपास ७३० कोटी रूपयांचा आयपीओ आणण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रेही सादर केली आहेत. या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश मातृभूम हे आहेत. अगदी कमी वेळात यशाच्या शिखरावर स्टार्टअप्सना पोहोचवणाऱ्या व्यक्तींच्या यादीतही गिरीश यांच्या नावाचा समावेश आहे. फ्रेशवर्कची स्थापना २०१० मध्ये करण्यात आली. तसंच जवळपास ११ वर्षांमध्ये कंपनीचं एकूण भांडवल जवळपास ३.५ अब्ज डॉलर्स इतकं झालं आहे. तसंच कंपनीनं नुकाताच आपला एका वर्षाचा महसूल हा ३० कोटी डॉलर्स असल्याचं म्हटलं आहे.

फ्रेMवर्कचे सीईओ गिरीश मातृभूम हे सुपरस्टार रजनीकां यांचे मोठे फॅन आहेत. फ्रेशवर्क या कंपनीची सुरुवात आधी फ्रेशडेस्क या नावानं चेन्नईमध्ये झाली होती. यापूर्वी त्यांचं ऑफिस चेन्नईमध्येच होतं. परंतु त्यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. आपल्या ऑफिसमध्ये एक ना एक दिवस रजनीकांत यांना आणायचं असं त्यांचं स्वप्न होतं. दरम्यान, मातृभूम यांनी आपल्या आयपीओचा कोडही रजनीकांत यांना समर्पित करम्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीओमध्ये रजनीकांत यांचा रोल काय?   
फ्रेशवर्क्सनं आपल्या आयपीओचं कोडनेम प्रोजेक्ट सुपरस्टार ठेवलं आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्यापासूनच प्रेरित होत त्यांनी हे नाव  ठेवलं आहे. मातृभूम हे रजनीकांत यांना आपला गुरू मानतात. तसंच त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरूवात केली होती. फ्रेशवर्कचा पहिला आयपीओ २०२१ मध्येच येणार आहे. फ्रेशवर्क्स भारतातील लिडिंग सॉफ्टवेअर कंपनी आहे जी सेवा अथवा SaaS firms म्हणून काम करते. कंपनीचं ध्येय हे १० अब्ज डॉलर्सची कंपनी बनण्याचं असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

रजनीकांतच्या चित्रपटासाठी थिएटर बुक
मातृभूम हे रजनीकांत यांचे इतके मोठे फॅन आहेत की त्यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण थिएटर बुक करतात. काही वर्षांपूर्वी गिरीश यांनी एक स्टार्टअप पुरस्कार पटकावला होता. त्यावेळी त्यांची मुलाखात घेण्यात आली होती. रजनीकांत यांना आपलं चेन्नईचं ऑफिस दाखवण्याची इच्छा असल्याचं त्यांनी मुलाखतीत म्हटलं. गिरीश यांनी इश्यूसाठी फाईल केलेल्या अर्जातील एका पॅरामध्ये रजनीकांत यांच्याबद्दल लिहिलं आहे.

Thank you, Thalaivaa!​ 
"आमच्या आयपीओचं कोडनेम प्रोजेक्ट सुपरस्टार होतं. हे नाव आमच्या तामिळनाडूतील सर्वात यशस्वी सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावावरून ठेवलं आहे. मी त्यांच्याप्रती माझं प्रेम आणि सन्मान व्यक्त करू इच्छित आहे. कारण ते माझ्यासाठी maanaseega guru आहेत. या शब्दाची बरोबरी करणारा इंग्रजीत कोणताही शब्द नाही, जो माझ्या भावना व्यक्त करू शकेल. ते मेन्टॉर आहे, रोल मॉडेल आहेत जे कायम माझ्या मनात असतात. त्यांना दूरूनच पाहून खुप काही शिकता येऊ शकतं," असं गिरीश यांनी लिहिलं आहे. सुपरस्टार ते असतात ज्यांना जगभरात लोक पूजतात आणि प्रेम करतात. ते जितके यशस्वी आहेत तितकेच ते नम्र आहेत, Thank you, Thalaivaa!​ असंही त्यांनी यात नमूद केलं आहे.  

Web Title: Freshworks files for 100 million dollar IPO founder thanks superstar actor Rajinikanth said Thank you Thalaivaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.