नवी दिल्ली – तंत्रज्ञानाला चमत्कार उगाच म्हटलं जात नाही. त्यामाध्यमातून केवळ आयुष्य जगणं सोप्पे झाले नाही तर कमी कालावधीत मोठी कमाईही केली जाऊ शकते. नवीन जमान्यात तंत्रज्ञान ChatGPT असेच पुढे आले आहे. २ मित्रांनी ChatGPT चा वापर करून अवघ्या १५ हजारांची गुंतवणूक करून काही महिन्यात १ कोटी रुपयांपर्यंत कमाई केली आहे.
ऐकून विश्वास बसणार नाही, परंतु ChatGPT मुळे हा चमत्कार सत्यात उतरला आहे. सीएनबीसीनुसार, २ मित्रांनी सैल एलो आणि मोनिका पॉवरनं ChatGPT च्या मदतीने एक स्टार्ट अप बनवले. त्यात सुरुवातीला १५ हजारांची(१८५ डॉलर) गुंतवणूक केली होती. या दोघांनी आर्टिफिशियल इंटेलीजेंसच्या मदतीने या तंत्रज्ञानाचा वापर केला त्यानंतर काही महिन्यात एका उद्योगपतीने त्यांचा स्टार्टअप १.५ लाख डॉलर(१.४० कोटी)ने खरेदी केला.
४ दिवसांत सुरू केले काम
सैल एलो आणि मोनिकाने त्यांच्या व्हर्चुअल स्टार्टअप आयडियाला सिलिकन व्हॅलीच्या प्रसिद्ध स्टार्टअप एक्सिलेटर वाय कॉम्बिनेटरच्या मदतीने अवघ्या ४ दिवसांत सुरू केले होते. या स्टार्टअपला ChatGPT ला योग्य प्रश्न कसे विचारावे. या समस्येचे समाधान कसं करावे. दोघांनी मिळून एआय आधारित रिसर्च टूल बनवले. ज्यात युजर्सला ChatGPT चा वापर कसा करावा हे शिकवले जाते.
ही कल्पना उद्योजकांसाठी वरदान ठरली
सैल आणि मोनिकाने त्यांची कल्पना स्टार्टअपमध्ये बदलली आणि DimeADozen नावाचे APP तयार केले. हे नवीन उद्योजकाच्या कल्पनांचे मूल्यमापन करते आणि एक रिपोर्ट बनवून त्यांना ब्ल्यूप्रिट तयार करून देते. त्याची किंमत फक्त ३९ डॉलर (रु. ३,१५९) आहे. त्याचे परिणाम पारंपारिक संशोधन एजन्सी आणि शोध इंजिनपेक्षा अधिक वेगाने येतात.