Lokmat Money > बिझनेस न्यूज > 12 कोटी शेतकऱ्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत...; गुड न्यूज घेऊन येणार जानेवारी महिना!

12 कोटी शेतकऱ्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत...; गुड न्यूज घेऊन येणार जानेवारी महिना!

शेतकरी पीएम सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची आस आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 06:03 PM2022-12-31T18:03:24+5:302022-12-31T18:05:58+5:30

शेतकरी पीएम सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची आस आहे.

From 12 crore farmers to central employees January will bring good news pm kisan samman nidhi 13th installment | 12 कोटी शेतकऱ्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत...; गुड न्यूज घेऊन येणार जानेवारी महिना!

12 कोटी शेतकऱ्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत...; गुड न्यूज घेऊन येणार जानेवारी महिना!

इंग्रजी नव वर्ष सुरू होण्यास आता केवळ काही तासच शिल्लक आहेत. या नव वर्षाचा पहिलाच महिना अर्थात जानेवारी महिना शेतकऱ्यांपासून ते केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत गुडन्यूज घेऊन येण्याची शक्यता आहे. शेतकरी पीएम सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची आस आहे.

13व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार - 
देशातील 12 कोटींहून अधिक शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकार पीएम-किसानचा 13 वा हप्ता जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात हस्तांतरित करू शकते. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2022 रोजी पीएम-किसान योजनेचा 10 वा हप्ता जारी केला होता. पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. ही रक्कम 4 महिन्यांच्या अंतराने 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए -  
केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणजेच डीए मिळणार आहे. साधारणपणे मार्च महिन्यात याची घोषणा होत असते. मात्र, भत्त्याची मोजणी जानेवारीपासूनच सुरू होते. जी केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या स्वरूपात मिळते. जानेवारी ते जून या सहामाहीसाठी, 4 टक्के दराने महागाई भत्ता वाढविला जाऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्क्यांप्रमाणे, महागाई भत्ता दिला जातो. यानुसार, नव्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत केंद्रीय केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता 42 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.
 

Web Title: From 12 crore farmers to central employees January will bring good news pm kisan samman nidhi 13th installment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.