Join us  

50MBPS पासून 1GBPS पर्यंत; पाहा TATA चे स्वस्त आणि मस्त ब्रॉडबँड प्लॅन्स, एअरटेल-रिलायन्सला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 4:09 PM

पाहा कोणते आहेत हे प्लॅन्स आणि काय मिळतंय खास.

टाटा प्ले फायबर (पूर्वीचं टाटा स्काय ब्रॉडबँड) तीन महिन्यांच्या वैधतेसह अनेक ब्रॉडबँड प्लॅन्स ऑफर करत आहे. तुम्हाला चांगला ब्रॉडबँड इंटरनेट अनुभव घ्यायचा असेल, तर टाटा प्ले फायबर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. कंपनी 50 एमबीपीएस स्पीडने सुरू होणारे आणि 1 जीबीपीएस स्पीडपर्यंत जाणारे अनेक प्लॅन्स ऑफर करते. कंपनीने ऑफर केलेल्या तीन महिन्यांच्या ब्रॉडबँड प्लॅनशी संबंधित माहिती आपण पाहणार आहोत.

Tata Play Fiber 50 Mbps स्पीडसह बेस प्लॅन ऑफर करत आहे. हा प्लॅन 1797 रुपये तीन महिने म्हणजेच 599 रुपये प्रति महिना उपलब्ध आहे. दरम्यान कंपनी सर्वच प्लॅनमध्ये 3.3TB फेअर युसेज पॉलिसी सोबत डेटा ऑफर करत आहे. यात उल्लेख केलेल्या कोणत्याही किंमतींमध्ये 18 टक्के जीएसटीचा समावेश नाही.

लिस्टमधील दुसरा प्लॅन म्हणजे 100 एमबीपीएस प्लॅन आहे. हा प्लॅनदेखील तीन महिन्यांच्या ऑप्शन्ससाठी ओळखला जातो. याची किंमत 2400 रुपये (800 रुपये प्रति महिना) इतकी आहे. त्यानंतर, 150 Mbps, 200 Mbps, 300 Mbps, 500 Mbps, आणि 1 Gbps हे प्लॅन्स 3000 रुपये, 3300 रुपये, 4500 रुपये, 6900 रुपये आणि 10,800 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.

काय आहे खास?हे सर्व प्लॅन ग्राहकांना मोफत फिक्स्ड लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शन देखील देतात. परंतु यासाठी ग्राहकांना स्वतंत्रपणे इन्स्ट्रुमेंट खरेदी करावे लागेल. तसेच, यापैकी कोणताही प्लॅन कोणत्याही प्रकारच्या ओव्हर-द-टॉप (OTT) सबस्क्रिप्शनसह येत नाही. Tata Play Fiber सध्या JioFiber, Airtel Xstream Fiber सारख्या कंपन्यांप्रमाणे कोणतही ओटीटी सबस्क्रीप्शन देत नाही.

टॅग्स :टाटारिलायन्स जिओएअरटेल