नवी दिल्ली - एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस असून सोमवारपासून मे महिन्याला सुरुवात होणार आहे. दर महिन्याला देशात काही ना काही बदल होत असतात जे तुमच्या आर्थिक खर्चाशी निगडित असतात. मे महिन्याच्या १ तारखेपासून यंदा ४ मोठे बदल होणार आहेत. ज्याचा तुमच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर, GST, Mutual Fund यासारख्या अनेक नियमात बदल होणार आहेत.
म्युच्युअल फंड KYCबाजार नियामक संस्था SEBI ने म्युच्युअल फंड कंपन्यांना म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याच ई-वॉलेटचा वापर केला आहे याची खात्री करण्यास सांगितले आहे, ज्यांचे KYC पूर्ण आहे. हा नियम १ मेपासून लागू होणार आहे. यानंतर गुंतवणूकदार केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे गुंतवणूक करू शकतात. केवायसीसाठी, तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक, मोबाइल नंबर आणि बँक तपशील द्यावा लागेल. या सर्व तपशीलांसह, केवायसीसाठी एक फॉर्म भरावा लागेल.
GST नियमांमध्ये बदल१ मे पासून व्यावसायिकांसाठी जीएसटीमध्ये मोठे बदल होणार आहेत. नवीन नियमानुसार, आता १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी, व्यवहाराची पावती ३० दिवसांच्या आत इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर (IRP) अपलोड करावी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कामासाठी अद्याप कोणतीही मुदत निश्चित करण्यात आलेली नाही.
LPG च्या दरात बदलपेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती निश्चित करतात. १ एप्रिल रोजी सरकारने १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ९१.५० रुपयांची कपात केली होती. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती एका वर्षात २२५ रुपयांनी कमी झाल्या आहेत. १ मे रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही बदल दिसू शकतात.
PNB ग्राहकांसाठी मोठा बदलदेशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने एटीएम व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. नवे नियम १ मे पासून लागू होणार आहेत. एटीएममधून पैसे काढताना पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांच्या खात्यात शिल्लक नसल्यास, व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर बँकेकडून १० रुपयांसह जीएसटी दंड म्हणून आकारला जाईल. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या वेबसाइटवर नोटीस जारी करताना ही माहिती दिली आहे.