जर तुम्हीही नोकरीकरणाऱ्यांपैकी एक असाल तर तुम्हाला कंपनीकडून काही रिअंबर्समेंटही मिळत असतील. या रिअंबर्समेंट (Reimbursement) टूल्सचा फायदा हा होतो की तुम्हाला त्या पैशांवर कर भरावा लागत नाही. फूड कुपन्स, कम्युनिकेशन, कन्व्हेयन्स, एलटीए, युनिफॉर्म अलाऊंस असे अनेक टूल्स असतात, जे रिअंबर्समेंटच्या कक्षेत येतात. परंतु हे टॅक्स फ्री का असतात असा प्रश्न असतो. सरकारला यातून काय फायदा होतो? हे आपण यातून समजून घेऊ.
जर तुम्हाला फूड किंवा एन्टरटेन्मेंट अथवा युनिफॉर्मसाठी मिळणाऱ्या पैशांवर टॅक्स सूट देण्यामागचा सरकारचा उद्देश अर्थव्यवस्थेला बूस्ट करण्याचा आहे. जर तुम्ही काही कपडे खरेदी केली किंवा खाण्यापिण्याचे पदार्थ घेतले तर जीएसटी अंतर्गत तुम्ही सरकारला कर देता. तुम्ही ज्या दुकानातून हे सर्व खरेदी केलं, तर त्यांनाही नफा होईल आणि दुकानदार तेच पैसे पुन्हा व्यवसायात लावेल. या पैशातून त्या ठिकाणी नोकरी करणार्यांना रोजगार मिळण्यास मदत होते. पैसा जितका अधिक प्रमाणात अर्थव्यवस्थेत फिरत राहील तितकीच आपली अर्थव्यवस्था अधिक वाढेल.
जेव्हा सरकार तुम्हाला एलटीए अंतर्गत कुठेतरी जाण्यासाठी भाड्यावर कर सूट देते, तेव्हा सरकारलाही खूप फायदा होतो. तुम्ही प्रवास करण्यासाठी घेतलेल्या रेल्वे किंवा विमानाच्या तिकीटातून जीएसटी सरकारपर्यंत पोहोचतो. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही कुठेतरी सहलीसाठी जाता, तेव्हा तुम्ही एका हॉटेलमध्ये थांबता, त्यामुळे त्या हॉटेलचा व्यवसाय वाढतो. तुम्ही आसपास फिरता, त्यामुळे तिथल्या दुकानदारांचाही व्यवसाय होतो. यानं अनेकांना फायदा होतो. हॉटेलवाले, दुकानदार, रस्त्यावरील विक्रेते, वाहतूकदार, खाण्यासाठी जाणारे लोक अशा सर्व लोकांमध्ये पैसा फिरतो, ज्यामुळे अर्थव्यवस्था वाढते.
पैसा खेळता राहणं उद्देशया सर्वांमध्ये सूट देण्याचा एक उद्देश असतो तो म्हणजे अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहणं. तुम्हाला या वस्तू घेतल्यानंतर मिळणारी ओरिजनल बिल्स लावावी लागतात. तेव्हाच तुम्हाला सूट मिळते. तर काही कंपन्या रिअंबर्समेंटची अमाऊंट थेट वॉलेटमध्ये टाकतात. तिथूनही तुम्ही निरनिराळ्या कॅटेगरीत ते खर्च करू शकता.