१ नोव्हेंबरपासून बार, लाउंज आणि कॅफेमध्ये बसून दारू पिण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. महाराष्ट्रातील बार, लाउंज आणि कॅफेमध्ये दिले जाणारे मद्य महाग होणार आहे. राज्य सरकारनं परमिट रुम लिकर सर्व्हिसवर १ नोव्हेंबरपासून व्हॅट ५ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, याचा दारूच्या दुकानांवरील ओव्हर-द-काउंटर विक्रीवर कोणताही परिणाम होणार नाही.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शुक्रवारी या संदर्भात सरकारी प्रस्ताव जारी करण्यात आला. यानंतर परमिट रूम मद्यावर एकूण व्हॅट दर १० टक्के असेल. स्टार हॉटेल्समध्ये मद्यसेवेत वाढ होणार नाही, याचं कारण म्हणजे ते आधीपासूनच अधिक व्हॅट भरत आहेत. पंचतारांकित हॉटेलमधील मद्य सेवेवर २० टक्के व्हॅट आहे. सरकारनं अलीकडेच परवाना शुल्कात केलेल्या वाढीमुळे ग्राहकांसाठी मद्य महाग झाल्यानं त्यांच्यावर आधीच बोजा वाढला असल्याची प्रतिक्रिया यावर हॉटेल व्यावसायिकांनी दिली.
येऊ शकते ही समस्या
व्हॅट वाढवल्यानं ऑफ प्रिमाईस जसं छतावर, पार्कांमध्ये, समुद्रकिनारी किंवा गाडी पार्क करून मद्यपान करण्याच्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो असं मत या क्षेत्रातील काही जणांचं मत आहे. ग्राहकांच्या पॅटर्नमधील बदलांचा केवळ बार आणि रेस्तराँ मालकांनाच नुकसान होणार नाही, तर कायदा सुव्यवस्थेसोबत ड्रिंक अँड ड्राईव्हसारखीही गंभीर आव्हानं निर्माण होतील असं त्यांचं म्हणणं आहे.
१ नोव्हेंबरपासून बार, लाउंज, कॅफेमध्ये बसून मद्यपान करणं महागणार, महाराष्ट्र सरकारनं वाढवला VAT
१ नोव्हेंबरपासून बार, लाउंज आणि कॅफेमध्ये बसून मद्यपानासाठी आता अधिक पैसे मोजावे लागतील.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 05:17 PM2023-10-22T17:17:21+5:302023-10-22T17:17:46+5:30