Join us

दिवाळखोरीचा उंबरठा ते तरुणाईची पसंती, सिद्धार्थलाल यांनी Royal Enfieldला अशी दिली नवी ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 4:01 PM

गेल्या काही वर्षांत निरनिराळी मॉडेल्स लाँच करून रॉयल एनफिल्डनं तरुणांना वेड लावलंय.

Royal Enfield Success Story: गेल्या काही वर्षांत निरनिराळी मॉडेल्स लाँच करून रॉयल एनफिल्डनं तरुणांना वेड लावलंय. रॉयल एन्फिल्डच्या बुलेटचे तर अनेक चाहते आजही दिसून येतात. भारतीय तरुणांमध्ये स्टाईल आणि एलिट क्लासची आवडती बाईक ठरलेली बुलेट आता जगभरातील तरुणांची आवड बनणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे १९९४ मध्ये रॉयल एन्फिल्ड दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती. पण आज सर्वाधिक नफा कमावणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनलीये. एका २६ वर्षीय तरुण सिद्धार्थ लाल यांनी कंपनीला नफ्यातील कंपनी बनवली. आर्थिक वर्ष २०१४ मध्ये रॉयल एन्फिल्डची कंपनी आयशर मोटर्सनं ८७३८ कोटी रूपयांचा महसूल मिळवला होता. तसंच यात ७०२ कोची रुपयांचा नफा कमावला. रंजक बाब म्हणजे रॉयल एन्फिल्डमुळे या नफ्याचा ८० टक्के हिस्सा आला होता. 

सिद्धार्थ लाल सीईओ बनले२००० मध्ये सिद्धार्थ लाल यांनी आयशर मोटर्सच्या सीईओपदाची धुरा सांभाळली. कंपनीला वाचवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. सिद्धार्थ लाल यांना बाईक रायडिंगची आवड आहे. २००० च्या दशकात भारतात हलक्या आणि कमी इंधनात अधिक मायलेज देणाऱ्या बाईक्सचा अक्षरश: पूर आला होता. यादरम्यान, एन्फिल्डसाठी कामकाज करणं आणि ते पुढे चालवणं कठीण होत चाललेलं. आपल्या अस्थित्वासाठी धडपडत असलेल्या रॉयल एन्फिल्डवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. 

नव्या मॉडेलला यशसिद्धार्थ लाल यांनी थंडरबर्ड आणि इलेक्ट्रा नावानं नवीन मॉडेल लाँच केली. यामुळे त्यांना तरुणांच्या मनात स्थान निर्माण करता आलं. सिद्धार्थ लाल यांना बायकिंगची आवड आहे आणि अनेकदा ते राईडसाठीही जातात. सिद्धार्थ लाल यांना लेह लडाखला बाईकवरुन जायचं होतं. परंतु ते शक्य होऊ शकलं नाही. २०१० मध्ये ते लेहच्या एका छोट्या गावात अडकले होते. ढगफुटीमुळे लेहचा संपर्क तुटला होता. याच वेळी त्यांना कोणत्याही परिस्थितीत साथ सोडणार नाही अशी विश्वासार्ह बाईक तयार करण्याचा विचार मनात आला आणि त्यांनी बुलेटचं रुपडं पालटलं.

मेड लाईक अ गनमेड लाईक अ गन हा त्यांचा ट्रेडमार्क आहे. १९६० मघ्ये रॉयल एन्फिल्डनं इंग्लंडमध्ये आपली पहिली मोटरसायकल तयार केली होती. यामध्ये २३९ सीसीचं इंजिन होतं. यानंतर कंपनीनं सातत्यानं त्यात इनोव्हेशन केलं, त्याचाच परिणाम आज दिसून येत आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात रॉयल एन्फिल्ड मोटरसायकल ब्रिटिश आर्मीद्वारे वापरण्यात आली होती. सिद्धार्थ लाल यांनी बुलेटच्या बाबतीत लोकांची विचार बदलण्यात मोठी भूमिका साकारली आहे.

लोकांचा दृष्टीकोन बदलणं आवश्यक असल्याची कल्पना सिद्धार्थ लाल यांना होती. यानंतर त्यांनी रॉयल एन्फिल्डच्या माध्यमातून डोगरांवर जाण्याचा निर्णय घेतला आणि बुलेटमध्ये येत असलेल्या समस्या दूर केल्या. यानंतर सिद्धार्थ लाल यांनी रॉयल इन्फिल्डचा दररोज वापर सुरू केला आणि लोकांनाही याचा दररोज वापर करण्याचं आवाहन केलं. यानंतर तरुणाईनंही याला साथ दिली आणि ही बाईक सर्वांच्या पसंतीची ठरू लागली. ही एक बाईक नाही तर एक इमोशन असल्याचं सिद्धार्थ लाल यांचं म्हणणं आहे.

टॅग्स :रॉयल एनफिल्डबाईकव्यवसाय