Join us

कोहली, धोनी ते शाहरुख, अमिताभपर्यंत; कोणत्या सेलिब्रिटीने किती टॅक्स भरला? बघा संपूर्ण लिस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 12:04 PM

फिल्म इंडस्ट्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास, सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान हा थलपथी विजय, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा अधिक टॅक्स भरणारा कलाकार ठरला आहे. सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे.

क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचा पाऊस पाडणारा विराट कोहली 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या क्रिकेटर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने या आर्थिक वर्षात एमएस धोनी, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या पेक्षाही अधिक टॅक्स भरला आहे. कोहलीने 2023-24 या आर्थिक वर्षात 66 कोटी रुपये एवढा टॅक्स भरला आहे. क्रिकेटशिवाय त्याच्या उत्पन्नाचे इतरही अनेक स्त्रोत आहेत.

फिल्म इंडस्ट्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास, सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान हा थलपथी विजय, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा अधिक टॅक्स भरणारा कलाकार ठरला आहे. सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे.

फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार, या लिस्टमध्ये विराट कोहलीनंतर, एमएस धोनी, सचिन तेंदुलकर, सौरव गांगुली आणि हार्दिक पांड्या हे टॉप-5 खेळाडू आहेत. महत्वाचे म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत नाही.

विराट कोहलीनंतर एमएस धोनीने 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक 38 कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. तर सचिन तेंडुलकरने 28 कोटी, सौरव गांगुलीने 23 कोटी आणि हार्दिक पांड्याने 13 कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. या यादीत ऋषभ पंत 10 कोटीसह सहाव्या क्रमांकावर आहे.

2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींसंदर्भात बोलायचे झाल्यास, शाहरुख खान 92 कोटी रुपयांसह यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर, दाक्षिणात्य अभिनेता थलपथी विजय 80 कोटींसह दुसऱ्या स्थानावर आहे, यानंतर, सलमान खान 75 कोटी रुपयांसह तिसऱ्या, तर अमिताभ बच्चन 71 कोटींच्या करासह चौथ्या स्थानावर आहेत.

हे आहेत सर्वाधिक टॅक्स भरणारे भारतीय सेलिब्रिटी-शाहरुख खान - 92 कोटी रुपयेथलपथी विजय – 80 कोटी रुपयेसलमान खान – 75 कोटी रुपयेअमिताभ बच्चन – 71 कोटी रुपयेविराट कोहली – 66 कोटी रुपयेअजय देवगण – 42 कोटी रुपयेएमएस धोनी - 38 कोटी रुपयेसचिन तेंडुलकर – 28 कोटी रुपयेहृतिक रोशन – 28 कोटी रुपयेकपिल शर्मा - 26 कोटी रुपयेसौरव गांगुली – 23 कोटी रुपयेकरीना कपूर - 20 कोटी रुपयेशाहिद कपूर - 14 कोटी रुपयेमोहनलाल - 14 कोटी रुअल्लू अर्जुन – 14 कोटी रुपयेहार्दिक पांड्या – 13 कोटी रुपयेकियारा अडवाणी - 12 कोटी रुपयेकतरिना कैफ - 11 कोटी रुपयेपंकज त्रिपाठी – 11 कोटी रुआमिर खान - 10 कोटी रुपयेऋषभ पंत – 10 कोटी रुपये

टॅग्स :करविराट कोहलीअमिताभ बच्चनशाहरुख खानमहेंद्रसिंग धोनीसचिन तेंडुलकररोहित शर्मा