Join us

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 6:02 PM

टाटा समूहाने आजच्या भारताच्या उभारणीचा भक्कम पाया रचला आहे.

Ratan Tata : भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज वरळीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा 1991 मध्ये समूहाचे अध्यक्ष झाले होते. तेव्हापासून त्यांनी विविध प्रकारचे व्यवसय सुरू केले आणि त्यात प्रचंड यश मिळवले. विशेष म्हणजे, आज आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात टाटाच्या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण टाटाची उत्पादने वापरतो.

रतन टाटा यांच्याकडे टाटा समूहाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी ऑटोमोबाइल, केमिकल, कंझ्यूमर प्रोडक्ट, एनर्जी, इंजीनिअरिंग, फायनान्शियल सर्व्हिस, इंफोर्मेशन सिस्टम, मटेरियल आणि टेलीकम्युनिकेशन सेक्टरमध्ये क्रांती घडवली. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी हात आजमावला आणि मोठे यशही मिळवले.

ही टाटा उत्पादने आपण रोज वापरतोटाटांनी लोकांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. प्रत्येक व्यक्ती दररोज टाटाची उत्पादने वापरतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कळत न कळत आपण टाटांची अनेक उत्पादने वापरतो. यामध्ये चहा पत्ती आणि मीठापासून ते एसी, फ्रीज, कुलर, घड्याळ, गाडी, कपडे, किराणा सामान आणि अगदी विमानाचाही समावेश आहे. 

तुम्यापैकी अनेकजण स्टारबक्समध्ये कॉफी पिण्यासाठी जाता, जो टाटाचा ब्रँड आहे. याशिवाय, अनेकजण वेस्टसाइड, झारा किंवा ज्युडिओचे कपडे घालतो. हेदेखील टाटाचे ब्रँड्स आहेत. अनेकजण बिग बास्केटवरुन रेशन मागवतात, हेदेखील टाटा ब्रँड आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी क्रोमा हे विश्वसनीय ठिकाण बनले आहे. हेदेखील टाटा समूहाचेच आहे. यासोबतच, टाटा स्काय, ताज हॉटेल्स आणि खुप काही...प्रत्येक क्षेत्रात आपण टाटाची उत्पादने वापरतो.

टॅग्स :रतन टाटाव्यवसायगुंतवणूकटाटा