नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेसमोर चलन संकोचाचे (किमती घसरण्याचे) संकट उभे असल्याचे सरकारने बुधवारी सांगून चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकासाचा दर ८ टक्के असेल, अशी आशा व्यक्त केली.मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम वार्ताहरांशी येथे बोलताना म्हणाले की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सकल देशी उत्पादन (जीडीपी) घसरले असले तरी वर्षात ८ टक्के विकास दर असेल. एकूण आर्थिक वाढ ही योग्य दिशेने जात आहे तरीही आर्थिक गरजांना आवश्यक तेवढी त्याची गती नाही; परंतु सध्या ज्या आर्थिक सुधारणा होत आहेत त्यामुळे अपेक्षित गती घेतली जाईल. सरकारसमोरील मुख्य आव्हान हे किमतीत वाढीचे नाही तर किमती कमी होण्याचे असू शकते, असे ते म्हणाले.
अर्थव्यवस्थेसमोर आता चलन संकोचाचे संकट
By admin | Published: September 02, 2015 11:14 PM