Join us  

चार्जिंग स्टेशन्सअभावी ईव्ही मालकांमध्ये निराशा; रेंज कमी असल्याने लांबच्या प्रवासाचा बेत आखता येईना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 7:54 AM

मागील काही महिन्यांपासून जगभराप्रमाणेच भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून जगभराप्रमाणेच भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढली आहे. सरकारनेही या ईव्हींचा वापर वाढावा यासाठी जोरदार प्रोत्साहन दिले आहे. परंतु देशात पुरेशी चार्जिंग स्टेशन्स नसल्याने ईव्ही मालकांमध्ये निराशा आहे. दूरच्या प्रवासासाठी आजही ईव्हीवर विसंबून राहता येत नाही, यामुळे ते चिंतित आहेत. ‘पार्क प्लस’ या संस्थेने याबाबत केलेल्या एका पाहणीत ५०० हून अधिक ईव्ही मालकांची मते जाणून घेण्यात आली. 

‘टो’ करुन आणावी लागेल का? : चार्जिंगमुळे प्रवासात इकडे-तिकडे जाता येत नाही. लाँग ड्राईव्हचा विचारही करता येत नाही. दूर गेल्यास येताना गाडी ‘टो’ करून आणवी लागेल का, ही चिता सतावत असते.

८८ टक्के मालकांनी सांगितले की ईव्हीतून बाहेर पडल्यानंतर सतत चार्जिग स्टेशन मिळेल की नाही, याची चिंता सतावत राहते. ७२ टक्के जणांच्या मते मेंटेनन्स व दुरुस्ती खर्च नेमका किती, हे अस्पष्ट असते. यासाठी नेहमी शोरूम मध्ये जाणे शक्य होत नाही. ५१ टक्के मालक म्हणाले की, पुन्हा ईव्ही खरेदी करणार नाही. गरज पडल्यास पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी गाडीचा विचार करू. ३३ टक्के वापरकर्ते म्हणाले की, ईव्हीला रिसेल व्हॅल्यू मिळत नाही. गाड्यांचे रेटिंग करणारी यंत्रणा अद्याप अस्तित्त्वात आलेली नाही. 

 

टॅग्स :इलेक्ट्रिक कारइलेक्ट्रिक कार / स्कूटर