Join us

ऑनलाईन फूड ऑर्डर करुन फसलात? कंपनीला असा शिकवा धडा! सरकारनेच दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 12:00 PM

Deliver Food Products : ऑनलाईन फूड डिलिव्हर कंपन्यांना सरकारने कडक इशारा दिला आहे. कुठल्याही प्रकारे ग्राहकांची फसवणूक खपवून घेणार नसल्याचा इशारा FSSAI ने दिला आहे.

Deliver Food Products : क्विक कॉमर्स कंपन्यांचा उदय झाल्यापासून स्मार्टफोनपासून कुठलेही खाद्यपदार्थांची १० मिनिटांत होम डिलिव्हरी होत आहे. लोकंही आता ऑनलाईन शॉपिंगला सरावली आहेत. पिशवी घेऊन बाजारात जाण्यापेक्षा घरातूनच मोबाईलवरुन वस्तू ऑर्डर केल्या जात आहेत. मात्र, यातून अनेक ग्राहकांची फसवणूक होत असल्याचेही प्रकार समोर येत आहे. लॅपटॉपऐवजी विटा तर खाद्यपदार्थांचा खालवलेला दर्जा, अशा बातम्या तुम्हीही पाहिल्या असतील. या घटनांची आता सरकारनेच गंभीर दखल घेतली  आहे. ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींमुळे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (FSSAI) ई-कॉमर्स कंपन्यांना निर्देश दिले आहेत.

ई कॉमर्स कंपन्यांना ग्राहकांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यास सांगितले आहे. कुठलेही खाद्यपदार्थ कमीत कमी ४५ दिवस खराब होणार नाहीत, म्हणजेच त्यांचे शेल्फ लाइफ चांगले असावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की FSSAI ने ई-कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्सची (FBO) एक बैठक बोलवण्यात आली आहे. यामध्ये फूड डिलिव्हरी संदर्भात आवश्यक उपोययोजनांवर चर्चा केली जाणार आहे.

निवेदनात FSSAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी गंजी कमला व्ही राव यांनी ई कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्सना ग्राहकांना देण्यात येणारे अन्नपदार्थांचे लाइफ ४५ दिवसांपर्यंत असावे, असे सांगितले आहे. 

फसव्या जाहिरातींबाबत इशाराअनेक फूड डिलिव्हरी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करतात. यापुढे अशा लोकांनावर कारवाई करणार असल्याचा इशार सीईओ राव यांनी दिला. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या कोणतेही उत्पादन लेबलवर दिलेल्या माहितीशी सुसंगत असले पाहिजे. FSSAI च्या लेबलिंग आणि प्रदर्शन नियमांचे पालन केले पाहिजे. 

ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण होणारई कॉमर्स कंपन्यांनी कुठल्याही प्रकारे ग्राहकांची फसवणूक करू नये असे आवाहन FSSAI ने केलं आहे. अन्यथा ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास आम्ही बांधील असल्याचा इशारा FSSAI ने दिला आहे. ग्राहकांना कुठलाही गैरप्रकार आढळल्यास त्यांनी तक्रार करण्याचे आवाहनही FSSAI ने केलं आहे.

टॅग्स :अन्न व औषध प्रशासन विभागझोमॅटोस्विगी