Join us

Nestle प्रकरणात FSSAI ला नोटिस, आता बेबी मिल्क आणि सेरेलॅकची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 8:48 AM

FSSAI Report on Nestle Baby Food Product: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं नेस्लेच्या बेबी मिल्क आणि सेरेलॅकमध्ये अतिरिक्त साखरेच्या मुद्द्यावर प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टची दखल घेतली आहे.

Nestle Product: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं नेस्लेच्या बेबी मिल्क आणि सेरेलॅकमध्ये अतिरिक्त साखरेच्या मुद्द्यावर प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टची दखल घेतली आहे. यानंतर यासंदर्भात FSSAI ला नोटीस बजावण्यात आली. आता भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण (FSSAI) स्विस तपास संस्था पब्लिक आय आणि इंटरनॅशनल बेबी फूड ॲक्शन नेटवर्कच्या (IBFAN) त्या दाव्याची तपासणी करत आहे, ज्यात भारतासारख्या देशांमध्ये नेस्ले बेबी मिल्क आणि सेरेलॅकसारख्या फूड प्रोडक्टमध्ये साखर आणि मध मिसळण्यात आलाय. 

हेही वाचा - Cerelac चा 'गोडवा' बाळांसाठी धोक्याचा?; साखरेचं प्रमाण पाहून बसेल धक्का, Nestle पुन्हा अडचणी 

निष्कर्षांची चौकशी केली जाईल आणि पुढील कारवाईसाठी इन-हाऊस सायंटिस्ट पॅनेलकडे तपास रिपोर्ट सादर केले जाणार असल्याची माहिती FSSAI नं दिली. "दावे खरे असल्याचे आढळल्यास, आवश्यक ती कारवाई केली जाईल," असं एका सूत्रानं सांगितलं. 

राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून नोटिस 

"रिपोर्ट्सनुसार, नेस्लेच्या काही बेबी फूड उत्पादनांमध्ये साखरेचा समावेश असू शकतो. यामुळे लहान मुलांच्या आरोग्यास हानी पोहोचू शकते. बेबी फूडनं पोषण गुणवत्ता आणि सुरक्षिततेसाठी कठोर मानकांची पूर्तता करावी," असं एनसीपीसीआरनं आपल्या नोटिसमध्ये म्हटलंय. तसंच एका आठवड्यात यासंदर्भातील रिपोर्टही मागवला आहे. 

कंपनीनं काय म्हटलं? 

'आम्ही ग्राहकांना खात्री देऊ इच्छितो की, लहान मुलांना दिल्या आमच्या जाणाऱ्या बेबी प्रोडक्टमध्ये प्रोटिन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आयरन इत्यादी पौष्टिक गोष्टी असतात. आम्ही आमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करत नाही आणि करणार नाही. भारतात उत्पादित केलेली आमची उत्पादनं कोडेक्स मानकांचं (WHO आणि FAO द्वारे स्थापन केलेला आयोग) काटेकोरपणे पालन करतात हे आम्ही सुनिश्चित करतो. नेस्ले इंडियासाठी अतिरिक्त साखरेचे प्रमाण कमी करण्यास प्राधान्य देते. गेल्या ५ वर्षांमध्ये आम्ही साखरेचं प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत कमी केलं आहे. आम्ही नियमितपणे आमच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करतो आणि आमच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करतो. नेस्ले इंडिया आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम पोषणयुक्त आहार देण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही हे १०० वर्षांपासून करत आहोत. आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये पोषण, गुणवत्ता आणि सुरक्षिततेची सर्वोच्च मानकं कायम ठेवू,' असं कंपनीनं म्हटलं आहे.

टॅग्स :अन्नव्यवसाय