नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या दिवसांपासून भडका सुरुच होता. मात्र दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाल्यानंतर आजच्या तिसऱ्या दिवशीही कपात झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 38 पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 13 पैशांनी कपात जाहीर केली आहे. इंधन उत्पादनावरील खर्चात घट झाल्याने ही कपात करण्यात आली आहे.
मुंबईत शनिवारी (20 ऑक्टोबर) पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैसे प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 87.46 रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर 79.00 रुपये झाला आहे. दुसरीकडे, राजधानी दिल्लीत पेट्रोल 39 पैसे तर डिझेल 12 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 81.99 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 75.36 रुपये वाहनधाराकांना मोजावे लागणार आहेत.