Join us

देशात इंधन दराने गाठला उच्चांक; पुन्हा झाली दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 11:23 AM

Fuel prices in India: एक दिवसाच्या खंडानंतर मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत अनुक्रमे २३ पैसे आणि २५ पैसे वाढ झाली. या दरवाढीनंतर दाेन्ही इंधनांचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले. मुंबई आणि जयपूरमध्ये डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. 

नवी दिल्ली : एक दिवसाच्या खंडानंतर मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत अनुक्रमे २३ पैसे आणि २५ पैसे वाढ झाली. या दरवाढीनंतर दाेन्ही इंधनांचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले. मुंबई आणि जयपूरमध्ये डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ९३.४४ रुपये लिटर, तर डिझेल ८४.३२ रुपये लिटर झाले. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल ९९.७१ रुपये लिटर, तर डिझेल ९१.५७ रुपये लिटर झाले. या महिन्यात इंधनाचे दर १३ वेळा वाढले आहेत. त्यात पेट्रोल लिटरमागे ३.०४ रुपयांनी, तर डिझेल लिटरमागे ३.५९ रुपयांनी महाग  झाले. राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल आधीच शंभरीपार गेले आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्येही पेट्रोल शंभरी पार गेले असून, हा विक्रम करणारी ती पहिली राजधानी आहे.  

देशातील काही प्रमुख शहरांतील इंधन दरशहर    पेट्रोल    डिझेलनवी दिल्ली    ९३.४४    ८४.३२मुंबई    ९९.७१    ९१.५७कोलकाता    ९३.४९    ८७.१६चेन्नई    ९५.०६    ८९.११बंगळुरू    ९६.५५    ८९.३९हैदराबाद    ९७.१२    ९१.९२भोपाळ    १०१.५२    ९२.७७जयपूर    ९९.९२    ९३.०५

टॅग्स :पेट्रोलभारत