Join us  

OPEC+ देशांनी उचललं मोठं पाऊल, पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 11:44 AM

यापूर्वी घेतलेला निर्णय एप्रिल महिन्यापर्यंत कायम ठेवण्यावर एकमत

ठळक मुद्देयापूर्वी घेतलेला निर्णय एप्रिल महिन्यापर्यंत कायम ठेवण्यावर एकमतकेवळ दोनच देशांकडून उत्पादन किरकोळ वाढवण्याची मान्यता

जगात कच्च्या तेलाचे उत्पादक असलेल्या प्रमुख देशांची संघटना OPEC+ नं एक मोठं पाऊल उचललं आहे. OPEC+ नं कच्च्या तेलाच्या उत्पादनात करण्यात येत असलेली कपात एप्रिल महिन्यापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही त्यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती. दरम्यान, आता केंद्र सरकारनं करात सूट दिली नाही तर येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.OPEC+ देशांच्या या निर्णयानंतर गुरूवाती ब्रेंट क्रुडच्या किंमतीत पाच टक्क्यांची वाढ होऊन ते ६७.५५ डॉलर्स प्रति बॅरलवर गेले. तर अमेरिकन WTF क्रुडचे दर ६४.५० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत गेले. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टर्स कंट्रीज आणि त्यांचे सहयोगी उत्पादक देश म्हणजेच OPEC+ देशांनी गुरूवारी उत्पादनात कपात सुरू ठेवणार असल्याचंच म्हटलं. तर रशिया आणि कझाकिस्तान या दोनच देशांनी उत्पादनात किरकोळ वाढ करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या विनंतीकडे दुर्लक्षभारत सरकारनं OPEC+ देशांना कच्च्या तेलाचं उत्पादन कमी न करण्याची अनेकदा विनंती केली आहे. परंतु यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करत कपात करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. "इंधनाची मागणी आता वाढत असून ती कोरोना पूर्व काळाच्या मागणीइतकी गोच आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाचे दर जबाबदार आणि योग्य स्तरावर असले पाहिजेत," असं मत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं."कच्च्या तेलाचे उत्पादक असलेल्या देशांनी २०२१ च्या सुरूवातीला मागणी वाढल्यानंतर त्यानुसारच उत्पादन केलं जाणार असल्याचं जागतिक बाजाराला आश्वासन दिलं होतं. परंतु आतापर्यंत ही परिस्थिती सामान्य झाली नाही हे खेदजनक आहे. जर तुम्ही पुरवठा योग्य ठेवला नाही आणि यात कृत्रिम अंतर ठेवलं गेलं तर दर वाढतीलच," असंही ते म्हणाले.  

टॅग्स :व्यवसायपेट्रोलडिझेलखनिज तेलरशियाभारत