Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol, Diesel Price Cut: पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची देश तीन महिने वाट पाहतोय; कच्चे तेलही कोसळले पण...

Petrol, Diesel Price Cut: पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची देश तीन महिने वाट पाहतोय; कच्चे तेलही कोसळले पण...

Petrol, Diesel Price Today: जेव्हा कच्च्या तेलाचे दर कमी झाले होते तेव्हा केंद्र सरकारने अबकारी करात मोठी वाढ करून त्याचा फायदा इंधन कपातीमध्ये होऊ दिला नव्हता. यामुळे गेल्या वर्षभरापासून हे दर चढेच होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 11:05 AM2022-07-24T11:05:29+5:302022-07-24T11:06:09+5:30

Petrol, Diesel Price Today: जेव्हा कच्च्या तेलाचे दर कमी झाले होते तेव्हा केंद्र सरकारने अबकारी करात मोठी वाढ करून त्याचा फायदा इंधन कपातीमध्ये होऊ दिला नव्हता. यामुळे गेल्या वर्षभरापासून हे दर चढेच होते.

Fuel Rate: The country is waiting for three months for petrol, diesel price cut; Crude oil also crashed but... | Petrol, Diesel Price Cut: पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची देश तीन महिने वाट पाहतोय; कच्चे तेलही कोसळले पण...

Petrol, Diesel Price Cut: पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची देश तीन महिने वाट पाहतोय; कच्चे तेलही कोसळले पण...

जागतिक बाजारातील कच्च्या तेलाने उसळी घेतल्याने गेल्या वर्षभरापासून इंधनाचे दर चढेच आहेत. त्यातच रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने त्यात आणखी ठिणगी पडली होती. पेट्रोलचे दर शंभरीपार गेलेले पुन्हा काही खाली आलेले नाहीत. डिझेलचे दर देखील शंभराच्या आसपास आहेत. असे असताना गेल्या तीन महिन्यांपासून कच्च्या तेलाचे दर घसरत आहेत. तरी देखील सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही.

जेव्हा कच्च्या तेलाचे दर कमी झाले होते तेव्हा केंद्र सरकारने अबकारी करात मोठी वाढ करून त्याचा फायदा इंधन कपातीमध्ये होऊ दिला नव्हता. यामुळे गेल्या वर्षभरापासून हे दर चढेच होते. कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर प्रति बॅरलपेक्षाही खाली गेले होते. परंतू, पेट्रोल, डिझेल हे ८०-९० च्या आसपास होते. आता पुन्हा कच्चे तेल कमी होऊ लागले असले तरी गेल्या तीन महिन्यांत दिलासा देण्यात आलेला नाही. 

रविवारी कच्च्य़ा तेलाचा दर 103 डॉलर प्रति बॅरल एवढा होता. पेट्रोल, डिझेलमध्ये शेवटचा दर बदल हा ६ एप्रिलला झाला होता. केंद्र सरकारने दिवाळीपासून दोन वेळा अबकारी करात कपात केली होती. परंतू महाराष्ट्राने केली नव्हती. आता भाजपाच्या पाठिंब्याने शिंदे सरकार आल्यावर त्यांनी काहीसे दर कमी केले आहेत. 

दिल्ली, मुंबईत सध्या किती आहेत किंमती...
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.


 

Web Title: Fuel Rate: The country is waiting for three months for petrol, diesel price cut; Crude oil also crashed but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.