जागतिक बाजारातील कच्च्या तेलाने उसळी घेतल्याने गेल्या वर्षभरापासून इंधनाचे दर चढेच आहेत. त्यातच रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने त्यात आणखी ठिणगी पडली होती. पेट्रोलचे दर शंभरीपार गेलेले पुन्हा काही खाली आलेले नाहीत. डिझेलचे दर देखील शंभराच्या आसपास आहेत. असे असताना गेल्या तीन महिन्यांपासून कच्च्या तेलाचे दर घसरत आहेत. तरी देखील सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही.
जेव्हा कच्च्या तेलाचे दर कमी झाले होते तेव्हा केंद्र सरकारने अबकारी करात मोठी वाढ करून त्याचा फायदा इंधन कपातीमध्ये होऊ दिला नव्हता. यामुळे गेल्या वर्षभरापासून हे दर चढेच होते. कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर प्रति बॅरलपेक्षाही खाली गेले होते. परंतू, पेट्रोल, डिझेल हे ८०-९० च्या आसपास होते. आता पुन्हा कच्चे तेल कमी होऊ लागले असले तरी गेल्या तीन महिन्यांत दिलासा देण्यात आलेला नाही.
रविवारी कच्च्य़ा तेलाचा दर 103 डॉलर प्रति बॅरल एवढा होता. पेट्रोल, डिझेलमध्ये शेवटचा दर बदल हा ६ एप्रिलला झाला होता. केंद्र सरकारने दिवाळीपासून दोन वेळा अबकारी करात कपात केली होती. परंतू महाराष्ट्राने केली नव्हती. आता भाजपाच्या पाठिंब्याने शिंदे सरकार आल्यावर त्यांनी काहीसे दर कमी केले आहेत.
दिल्ली, मुंबईत सध्या किती आहेत किंमती...दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरमुंबई पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरचेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरकोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरपोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.