Join us

प्रचंड वाढलेल्या किमतीमुळे एप्रिलमध्ये घटली इंधन विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 8:12 AM

प्राप्त माहितीनुसार, पेट्रोलच्या विक्रीत तब्बल १० टक्के, तर डिझेलच्या विक्रीत १५.६ टक्के घट झाली आहे. कोविड-१९ साथीच्या काळातही वृद्धी दर्शविणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या विक्रीत १.७ टक्के घट झाली आहे.

नवी दिल्ली : दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे एप्रिलच्या पहिल्या १६ दिवसात भारतातील इंधनाच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. प्राथमिक औद्योगिक आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.प्राप्त माहितीनुसार, पेट्रोलच्या विक्रीत तब्बल १० टक्के, तर डिझेलच्या विक्रीत १५.६ टक्के घट झाली आहे. कोविड-१९ साथीच्या काळातही वृद्धी दर्शविणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या विक्रीत १.७ टक्के घट झाली आहे.

पाच राज्यांतील निवडणुकांच्या काळात १३७ दिवस न झालेली इंधन दरवाढ २२ मार्च रोजी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल अनेक शहरांत १२४ रुपये लिटरवर पोहोचल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे.

दोन दशकांतील सर्वाधिक पाक्षिक वाढ-    दि. २२ मार्च ते ६ एप्रिल या काळात पेट्रोल-डिझेल प्रतिलीटर १० रुपयांनी महागले. -    दोन दशकांपूर्वी इंधननियंत्रणमुक्त करण्यात आल्यापासून १६ दिवसांच्या कालावधीत झालेली ही सर्वाधिक दरवाढ ठरली आहे.-    २२ मार्च रोजी स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरही ५० रुपयांनी वाढून ९४९.५० रुपयांना झाला.-    जेट इंधन २०.५ टक्क्यांनी वाढून १,१३,२०२.३३ रुपये किलोलीटर झाले.  

टॅग्स :पेट्रोलडिझेल