Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'फ्युचर रिटेल'नं खराब केलं गुंतवणूकदारांचं ‘प्रेझेंट’, एका लाखाचे झाले १८ हजार

'फ्युचर रिटेल'नं खराब केलं गुंतवणूकदारांचं ‘प्रेझेंट’, एका लाखाचे झाले १८ हजार

कर्जबाजारी फ्युचर रिटेलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 04:00 PM2022-05-31T16:00:19+5:302022-05-31T16:00:40+5:30

कर्जबाजारी फ्युचर रिटेलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

future retail shares spoiled the present of investors one lakh rupees remained 18000 bse nse share market | 'फ्युचर रिटेल'नं खराब केलं गुंतवणूकदारांचं ‘प्रेझेंट’, एका लाखाचे झाले १८ हजार

'फ्युचर रिटेल'नं खराब केलं गुंतवणूकदारांचं ‘प्रेझेंट’, एका लाखाचे झाले १८ हजार

कर्जबाजारी फ्युचर रिटेलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फ्युचर रिटेलचे शेअर्स गेल्या 3 महिन्यांत 82.55 टक्क्यांनी घसरले आहेत. यामध्ये रिलायन्स-फ्युचर-अॅमेझॉन वादही आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या महिन्यात फ्युचर रिटेलसोबतचा 24,713 कोटी रुपयांचा संभाव्य करार रद्द केला होता.

सलग चौथ्या तिमाहीत कंपनीला 1063.36 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यासोबतच या शेअरची किंमत सातत्यानं घसरत आहे. त्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 76.25 रुपये होती आणि निचांकी पातळी 8.15 रुपये आहे. जर आपण गेल्या एका आठवड्याबद्दल सांगायचे झाले तर, फ्यूचर रिटेलचे शेअर्स 21.2 टक्क्यांनी घसरले आहेत. म्हणजेच आठवडाभरापूर्वी ज्याने त्यात एक लाख रुपये गुंतवले असतील, त्याचे एक लाख आता 80 हजारांपेक्षा कमी झाले असतील.

1 लाखाचे झाले 18 हजार

गेल्या एका महिन्याबद्दल सांगायचे झाले तर हा शेअर 62.50 टक्क्यांनी घसरला आहे. तर तीन महिन्यांपूर्वी ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. कारण या कालावधीत हा शेअर 82.55 टक्क्यांनी घसरला आहे. म्हणजेच 3 महिन्यांपूर्वी त्यात एक लाख रुपये गुंतवले आहेत, त्याचे मूल्य आता सुमारे 18000 रुपयांपेक्षा कमी आहे.

Web Title: future retail shares spoiled the present of investors one lakh rupees remained 18000 bse nse share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.