Join us

G20 मध्ये बायडेनपासून शेख हसिनांपर्यंत प्रत्येकाला १००० रुपये दिले जाणार; कशासाठी? मोदींचा जबरदस्त प्लॅन...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 4:31 PM

G-20 शिखर परिषदेच्या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय परंपरा आणि संस्कृतीशी संबंधित असलेल्या गोष्टी ठेवल्या जातात. अनेक खादी उत्पादने उपलब्ध आहेत.

गेल्या काही दिवसापासून दिल्लीत G-20 शिखर परिषदेच्या तयारी सुरू आहे. आता शिखर परिषदेला दिल्लीत पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जवळपास सर्व राष्ट्रपती, पंतप्रधान शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत दिल्लीला पोहोचतील. पाहुण्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे, दिल्लीच्या प्रत्येक रस्त्यावर G-20 ची झलक पाहायला मिळत आहे. देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, हा संदेश या व्यासपीठाच्या माध्यमातून जगाला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भारताच्या प्रगतीत डिजिटल माध्यमाचा मोठा वाटा आहे. डिजिटल व्यवहारांनी बँकिंग क्षेत्राला नवे रूप दिले आहे.

"50 वर्षांचं काम 6 वर्षांत केलं"! G20 पूर्वी जागतिक बँकेकडून भारताचं जबरदस्त कौतुक!

UPI चा फायदा घेण्याची योजना अशा परिस्थितीत, G20 च्या पाहुण्यांना डिजिटल इंडियाबद्दल तपशीलवार माहिती दिली जाईल. तंत्रज्ञानात भारत आता कोणत्याही विकसित देशापेक्षा कमी नाही. या एपिसोडमध्ये G-20 समिटमध्ये UPI दिसणार आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी किमान १००० परदेशी पाहुणे येतील, असे मानले जात आहे. प्रत्येकाला UPI बद्दल जागरूक करण्यासाठी, सरकारने एक योजना तयार केली आहे, ज्या अंतर्गत सर्व पाहुण्यांना १०००-१००० रुपये हस्तांतरित केले जातील.

सरकारने सुमारे १००० विदेशी प्रतिनिधींना UPI तंत्रज्ञानाची माहिती देण्याची योजना आखली आहे. त्यांना UPI च्या वापराबाबत सांगितले जाईल. सर्व पाहुण्यांच्या UPI वॉलेटमध्ये १,००० दिले जातील जेणेकरून ते UPI द्वारे व्यवहार करू शकतील. त्यासाठी १० लाख रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकार सर्व संभाव्य प्रतिनिधींसाठी वॉलेट बनवत आहे. शिखर परिषदेच्या ठिकाणी अनेक स्टॉल्स लावण्यात आले आहेत, यामध्ये शिष्टमंडळाच्या वॉलेटात १००० रुपयांपर्यंतची रक्कम ठेवली जाईल. त्याद्वारे, ते शिखर स्थळावरील स्टॉल्समधून वस्तू खरेदी करु शकतील.

G-20 शिखर परिषदेच्या ठिकाणी सर्व प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय परंपरा आणि संस्कृतीशी संबंधित असलेल्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. सर्व खादी उत्पादने उपलब्ध आहेत. पाहुणे त्यांच्या वॉलेटमधील पैशाने या वस्तू खरेदी करू शकतील. जेव्हा पाहुण स्वतः UPI वापरतील, तेव्हा त्यांना कळेल की भारतात डिजिटल व्यवहार किती सोपे झाले आहेत.

सरकारला UPI च्या यशाचा फायदा घ्यायचा आहे, भारतामध्ये डिजिटल पेमेंट किती सोपे झाले आहे हे जगाला कळावे हा सरकारचा उद्देश आहे. यातून लोकांचे जीवन कसे चांगले होत आहे. UPI व्यतिरिक्त, G-20 प्रतिनिधींना भारताच्या आधार आणि DigiLocker बद्दल देखील माहिती दिली जाईल. UPI चा वापर फक्त भारतापुरता मर्यादित न राहता इतर देशांनीही वापरावा अशी भारत सरकारची योजना आहे. आतापर्यंत श्रीलंका, फ्रान्स, UAE आणि सिंगापूरने उदयोन्मुख फिनटेक आणि पेमेंट सोल्यूशन्सवर भारतासोबत भागीदारी केली आहे.

टॅग्स :जी-२० शिखर परिषदनरेंद्र मोदीभाजपा