नवी दिल्ली : गेल्या कही वर्षांमध्ये महाप्रचंड वेगाने सर्वच आघाड्यांवर उद्योग क्षेत्र विस्तारणाऱ्या उद्योजक गौतम अदानी यांनी जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली
अदानींची अशी वाढत गेली संपत्ती
२००० : ३,३०० कोटी
२०१३ : ४७ हजार कोटी
२०१६ : ३ अब्ज डॉलर
२०१७ : ७ अब्ज डॉलर
२०१८ : १० अब्ज डॉलर
२०१९ : ९ अब्ज डॉलर
२०२० : ९ अब्ज डॉलर
२०२१ : ८३.८९ अब्ज डॉलर
२०२२ : १२३ अब्ज डॉलर
का वाढते संपत्ती?
२०२० पासून अदानींच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यांच्या अक्षय ऊर्जा कंपनी, अदानी ग्रीनच्या बाजारातील ब्लॉकबस्टर कामगिरीनंतर त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. अदानींच्या सर्वच कंपन्यांचे समभाग सध्या सर्वकालीन उच्चांकावर आहे. ते २३५%नी
वाढले आहेत. त्यामुळे अदानींच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे.