Join us

Ganesh Mahotsav: तू सुखकर्ता, समृद्धीदाता! गुंतवणुकदारांवर बाप्पाची कृपा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 7:00 AM

Ganesh Mahotsav: विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आगमनाच्या एक दिवस आधीच गुंतवणूकदारांना बाप्पा पावला. एकाच दिवसात गुंतवणकूदार ५.६८ लाख कोटी रुपयांनी मालामाल झाले. 

 मुंबई : विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आगमनाच्या एक दिवस आधीच गुंतवणूकदारांना बाप्पा पावला. एकाच दिवसात गुंतवणकूदार ५.६८ लाख कोटी रुपयांनी मालामाल झाले. जागतिक बाजारांतील घसरणीपुढे लोटांगण न घालता भारतीय अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे शेअर बाजाराने मंगळवारी दाखवून दिले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने एकाच दिवशी १,५६४ अंकांची उसळी घेतली. निर्देशांकामधील २०२२ मधील ही दुसरी सर्वात मोठी उसळी ठरली.मंगळवारी निर्देशांक २.७० टक्के वाढीसह ५९,५३७ अंकांवर बंद झाला. निफ्टीही ४४६ अंकांनी वाढून १७,७५९ अंकांवर बंद झाला. आयटी आणि बँकिंग या दोन क्षेत्रातील गुंतवणूकदारांना जास्त फायदा झाला.  कच्चे तेल उतरलेकच्च्या तेलाच्या किमती २.६० टक्क्यांनी कमी होत १०२ डॉलर प्रति बॅरलवर आल्या. याचवेळी जागतिक बाजारांत अमेरिकी डॉलरची घसरण झाल्याने गुंतवणूक वाढली. दोन्हीचा परिणाम म्हणून  बाजारात वाढ झाली.

रुपया सावरलाशेअर बाजारात वाढ होत असल्याचा फायदा रुपयालाही झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया ४७ पैशांनी वधारून ७९.४४ वर पोहोचला आहे. रुपया कोसळला तर देशाला आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागतात, परिणामी महागाई वाढते.

शेअर बाजारात होत असलेली वाढ जागितक अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था किती भक्कम आहे, हे दर्शवते. सध्या बाजारात समभाग अधिक वाढले आहेत. मात्र, विदेशी गुंतवणूकदारांकडून सतत होत असलेल्या गुंतवणुकीमुळे भारतीय बाजार वाढला आहे.- बाजार तज्ज्ञ

गुंतवणूकदार मालामालशेअर बाजारात वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले असून, त्यांची संपत्ती एकाच दिवसांत ५.६८ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. कंपन्यांचे भागभांडवलही ५,६८,३०५.५६ कोटी रुपयांनी वाढून २,८०,२४,६२१.८३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

टॅग्स :गणेशोत्सवगुंतवणूक