मुंबई : सोलापुरात सरकारतर्फे ५00 कोटी रुपये खर्चून लवकरच ५० एकर जागेवर गारमेंट पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
सोलापूर येथे झालेल्या भारतातील दुसºया गणवेश व वस्त्र उत्पादकांच्या तीन दिवसांच्या भव्य प्रदर्शनानंतर त्यांनी येथे सांगितले की, सोलापूरमध्ये वस्त्रोद्योगाचे दालनही सुरू करण्यात येणार आहे.
प्रदर्शनाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, ऋषिकेश मफतलाल, बँक आॅफ इंडियाचे महाव्यवस्थापक अजयकुमार साहू, सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे रामवल्लभ जाजू व उपाध्यक्ष नीलेश शाह उपस्थित होते. सुभाष देशमुख म्हणाले की, सोलापूरमध्ये मुबलक जमीन व मनुष्यबळ आहे.
देशभरातील १० हजार रिटेलर्सनी या प्रदर्शनाला भेट दिली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे १५०हून अधिक ब्रँड सहभागी झाले होते. हे प्रदर्शन गणवेश, वस्त्रोद्योग आणि घरगुती कपडे यांच्याबद्दलची माहिती एकाच छताखाली मिळविण्याची ग्राहक आणि इतर उपस्थितांना एक सुवर्णसंधी होती.
सोलापुरात गारमेंट पार्क लवकरच
सोलापुरात सरकारतर्फे ५00 कोटी रुपये खर्चून लवकरच ५० एकर जागेवर गारमेंट पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:39 AM2018-01-30T01:39:17+5:302018-01-30T01:39:20+5:30